जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील सावखेडा ब्रु येथील पोलीस चंद्रकांत पाटील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दहशत माजवून बेकायदा हस्तक्षेप करीत असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
सावखेडयाचे मंगेश पानपाटील यांनी दाखल केलेल्या तक्रारीत पुढे म्हटले आहे की, सावखेडा ब्रु गावात ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. मंगेश पानपाटील वार्ड क्र- 2 मध्ये (ट्रॅक्टर) या चिन्हावर निवडणूक लढवीत आहेत, वयाच्या २२ व्या वर्षी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. पोलीस चंद्रकांत पाटील यांच्या पत्नी सुकिर्ती पाटील यादेखील वार्ड क्र-२ मधून नारळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहे. आपली पत्नी निवडणूक जिंकावी या उद्देशाने पोलीस पाटील गावकऱ्यांमध्ये दहशत पसरविण्याचे कृत्य करीत आहे. माझ्या पत्नीला मतदान केले नाही, तर मी पोलीस पाटील असल्याने घरकुल अथवा अन्य योजना लाभ मिळू देणार नाही, खोट्या पोलीस केसमध्ये अडकवीन अशी धमकी पोलीस चंद्रकांत पाटील हे मतदारांना देत आहेत ते पोलीस पाटील पदाचा दुरुपयोग करीत आहेत.
त्यांच्या ह्या दहशती गुंडा-गर्दीतून गावाला मुक्त करावे अशी मागणी मंगेश पानपाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री, निवडणूक निर्णय अधिकारी व तहीलदार, (जळगाव) यांनाही पाठविल्या आहेत.