जळगाव (प्रतिनिधी) अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती जळगाव आयोजित महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनापासून ते राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या स्मृती दिनापर्यंत समितीतर्फे विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
त्यामध्ये ‘चला कार्यकर्त्यांना वक्ता बनवूया’ या उपक्रमांतर्गत समितीच्या उगलाल शिंदे, सुधीर काळवाघे, के. आर. केदार, मनीषा सूर्यवंशी, यांची व्याख्याने ठेवण्यात आली. तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन निबंध व चित्रकला स्पर्धेचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे दिनांक ६ डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अंधश्रद्धा निर्मूलन विषयक विचार या विषयावर प्राध्यापक डॉक्टर प्रकाश कांबळे यांचे व्याख्यान देवेंद्र नगर राम मंदिराजवळ दिनांक २० डिसेंबर रोजी सुरेश बोरसे वाघाडी. तालुका शिरपूर. यांचे गाडगेबाबांचे अंधश्रद्धा निर्मूलन विषयक विचार या विषयावर व्याख्यान परमार्थ साधना केंद्र गणेशवाडी जळगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानी मुकुंद भाऊ सपकाळे प्रमुख अतिथी पवार, दिलीप सपकाळे, जे. डी ठाकरे, यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा सूर्यवंशी मॅडम, योगेश करंदीकर, प्रास्ताविक संघटक विनोद सपकाळे यांनी केले तर, आभार प्रदर्शन जे. डी. ठाकरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महेश शिंपी, निंबाजी बारी, सागर पाटील, चंद्रकिरण ठाकरे, चित्रकार दाभाडे, इश् महेश शिंपी, अविष्कार सपकाळे, देवकाबाई ठाकरे, पल्लवी शिंपी, अर्चना सपकाळे, प्रियंका साळवे, निशा पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम प्रसंगी बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती कार्यक्रम अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला निबंध व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.