जळगाव (प्रतिनिधी) रोटरी क्लब जळगाव ईलाइटतर्फे आयोजित मोफत २० दिवसीय बेसिक ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचा समारोप स्वातंत्र्य चौकाजवळील इंडिया प्लाझामध्ये झाला. या शिबिराचा लाभ ४० प्रशिक्षणार्थिंनी घेतला. त्यांना प्रांतपाल रमेश मेहर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
व्यासपीठावर सहाय्यक प्रांतपाल विष्णू भंगाळे, प्रशिक्षिका लीना झोपे, क्लबचे अध्यक्ष नितीन इंगळे, सचिव संदीप असोदेकर, व्होकेशनल कमिटी चेअरमन मनीषा पाटील उपस्थित होते. या प्रशिक्षणामुळे आत्मनिर्भर होऊन स्वयंरोजगाराची प्रेरणा मिळाली. या प्रशिक्षणात बेसिक ब्युटी पार्लरचे ज्ञान मिळाले. यात अॅडव्हाॅन्स कोर्सची भर टाकून स्वमालकीचे ब्युटी पार्लर सुरू करता येईल. त्यामुळे स्वयंरोजगार उभारुन महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यास मदत होईल, असे मत प्रशिक्षणार्थी हर्षदा पाटील, नम्रता ब्राह्मणे, दुर्गा वामन यांनी व्यक्त केले. प्रशिक्षणार्थिंशी रमेश मेहर यांनी सुसंवाद साधला. स्वयंरोजगार निर्मितीसाठी रोटरी परिवारी प्रशिक्षणार्थींसोबत अाहे, असे आश्वासन रमेश मेहर यांनी दिली. सूत्रसंचालन डॉ. वैजयंती पाध्ये यांनी केले. यावेळी चारू इंगळे, काजल असोदेकर, रुची मणियार, रेखा बियाणी, मनीषा खडके आदी उपस्थित होत्या.