TheClearNews.Com
Wednesday, May 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विकासात्मक कामे लवकर पूर्ण करुन नागरीकांना लाभ मिळवून द्या- खा.रक्षाताई खडसे

The Clear News Desk by The Clear News Desk
October 5, 2020
in आरोग्य, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) यंत्रणांनी शासनाच्या योजनांच्या माध्यमातून विविध विकासात्मक कामे लवकरात लवकर पूर्ण करुन नागरीकांना त्याचा लाभ मिळवून द्यावा. असे निर्देश खासदार रक्षाताई खडसे यांनी आज दिले.

जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) ची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात खासदार खडसे यांच्या अध्यक्षतेखाली आज ऑनलाईन पार पडली, यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजनाताई पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार लताताई सोनवणे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, उप वनसंरक्षक विवेक होशिंग, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, महावितरणचे अधिक्षक अभियंता शेख, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. शिरसाठ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते तर खासदार उन्मेष पाटील, आमदार चिमणराव पाटील यांचेसह विविध पंचायत समित्यांचे सभापती व अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.

READ ALSO

खरीप हंगामासाठी प्रशासन सज्ज; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न

लग्नाचे अमिष; पुण्याच्या तरुणीवर जळगावात अत्याचार

यावेळी खासदार श्रीमती खडसे म्हणाल्या की, कोरोनामुळे मागील काळात लॉकडाऊनमुळे विविध विकास कामे करता आली नाही. परंतु आता कामांना गती देऊन शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी यंत्रणांनी प्रयत्न करावेत व या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून देण्याच सूचनाही त्यांनी दिल्यात. जिल्ह्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांची गती वाढवा. जिल्ह्यातील ज्या नगरपालिकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा निधी प्राप्त झाला नसेल त्याची माहिती द्यावी, हागणदारीमुक्त गावांमध्ये नागरीक उघडयावर शौचास जातात हे योग्य नसून स्वच्छ भारत योजनेत वैयक्तिक शौचालयांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावी. तसेच रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतरस्त्यांची कामे करावीत. कोरोनामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण आहे. त्यातच खाजगी रुग्णालये रुग्णांकडून चुकीची बिलांची आकारणी करीत आहे. कोविड उपचार करणाऱ्या रुग्णालयाबाहेर उपचाराचे दरपत्रक लावणे आवश्यक आहे. जेणेकरुन सर्वसामान्य नागरीकांची लुट होणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औषधांचा साठा मुबलक राहील याचीही यंत्रणेने दक्षता घ्यावी, त्याचप्रमाणे कोरोना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न करावे, कोविड उपचार करणाऱ्या खाजगी रुग्णालयांची माहिती लोकप्रतिनिधींना देण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्यात.

योजनांच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होता कामा नये – खासदार उन्मेष पाटील
सर्वसामान्य नागरीकांसाठी शासन विविध लोकोपयोगी योजना राबवित असते. या योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. जे अधिकारी योजनांच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष करतील. त्यांचेवर कारवाई करण्याची सुचना खासदार उन्मेष पाटील यांनी केली. तसेच अमृत योजनेची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, शिवाजी नगर पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत नागरीकांना रेल्वेच्या ओव्हरब्रीजवरुन ये-जा करण्यास परवानगी मिळण्याची सुचनाही त्यांनी केली.

यावेळी जिप अध्यक्षा श्रीमती रंजनाताई पाटील, आमदार सुरेश भाळे, चिमणराव पाटील, लताताई सोनवणे यांच्यासह पंचायत समिती सभापती, नगराध्यक्ष यांनीही विविध सुचना मांडल्यात. मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजनेत जिल्ह्यातील पंधरापैकी दहा तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. उर्वरित तालुक्यांचा समावेश करण्यासाठी प्रशासनातर्फे शासनास प्रस्ताव पाठविण्यात येईल असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी बैठकीत सांगितले.

या बैठकीत प्रधानमंत्री पिक विमा योजना, सर्व शिक्षा अभियान, मुख्यमंत्री सौर कृषि योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, पाणीपुरवठा योजना, मध्यान्ह पोषण आहार योजना, रोजगार हमी योजना अमृत योजनांसह दूरसंचार, रेल्वे, खणीकर्म या मुलभूत सुविधा आदिंचाही आढावा घेण्यात आला.

 

 

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

खरीप हंगामासाठी प्रशासन सज्ज; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न

May 20, 2026
गुन्हे

लग्नाचे अमिष; पुण्याच्या तरुणीवर जळगावात अत्याचार

May 20, 2026
गुन्हे

कंपनीच्या बँक खात्यातील रक्कम संचालकांच्या खात्यावर केली ट्रान्सफर

May 19, 2026
गुन्हे

मद्याच्या नशेत रोखले पिस्तूल

May 19, 2026
धरणगाव

धरणगाव विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार; ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू?

May 18, 2026
जळगाव

पिकांची उत्पादकता वाढीसाठी शेतकऱ्यांनी पर्यावरणपूरक आणि जास्त कार्यक्षम नॅनो खतांचा वापर करावा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

May 18, 2026
Next Post

दिलासादायक : जिल्ह्यात आज ५०१ रुग्णांची कोरोनावर मात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून सरकारच्या योजनांची माहिती लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहचत आहे : ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन !

December 9, 2023

पुलवामाप्रकरणी काँग्रेसने देशाची माफी मागावी, भाजपाची मागणी

October 31, 2020

‘केंद्र सरकार केवळ श्रेय घेत राहिलं आणि देशात कोरोना वाढत गेला’ : अमर्त्य सेन

June 5, 2021

दिलासादायक : जळगाव जिल्ह्यात ५०३ रुग्णांची कोरोनावर मात

October 6, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group