TheClearNews.Com
Thursday, October 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विजेचा शॉक लागून ठाकरे गटाच्या विभाग प्रमुखाचा मृत्यू

पिंप्राळा परिसरातील घटना, कुटुंबियांचा जिल्हा रुग्णालयात आक्रोश

vijay waghmare by vijay waghmare
October 29, 2026
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – घराजवळच राहणाऱ्या मित्राच्या घरी दुरुस्तीसाठी गेलेल्या योगेश उर्फ भैय्या शिवाजी वाघ (वय ४३, रा. पिंप्राळा) या शिवसेना ठाकरे गटाच्या विभाग प्रमुखाचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवार दि. २८ ऑक्टोंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच त्यांच्या नातेवाईकांसह मित्रांनी जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. घरातील कर्ता व्यक्तीच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

शहरातील पिंप्राळा परिसरात राहणारे शिवसेना ठाकरे गटाचे विभाग प्रमुख योगेश उर्फ भैय्या वाघ हे कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. ते इलेक्ट्रीशीयन असून बुधवारी सकाळच्या सुमारास ते त्याच परिसरात राहणाऱ्या सतिष मोरे यांच्याकडे दुरुस्तीच्या कामासाठी गेले होते. घरातील इलेक्ट्रीक बोर्डमध्ये दुरुस्तीचे काम करीत असतांना अचानक त्यांना विजेचा जोरदार शॉक लागून ते खाली कोसळले. दरम्यान, ही घटना मोरे कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने योगेश वाघ यांना तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करीत त्यांना मयत घोषीत केले.

READ ALSO

दोन घरफोड्या; ५१ हजारांचा ऐवज लंपास

महामार्गाने घेतला १३वा बळी, बायपासवर मृत्यूचे सत्र थांबेना !

नातेवाईकांसह मित्रांची जिल्हा रुग्णालयात गर्दी

शॉक लागून योगेश वाघ यांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या नातेवाईकांसह शिवसेना जिल्हा प्रमुख कुलभुषण पाटील यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्र परिवाराने जिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती. प्रत्येकाच्या मदतीसाठी धावून येणारा आणि मनमिळावू स्वभाव असलेल्या योगेश वाघ यांचा दुर्देवी मृत्यूने पिंप्राळा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. १८ दिवस मुलगा होता कोमात योगेश वाघ यांच्या पश्चात
आई, वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. दोन वर्षापुर्वी त्यांची पत्नी आणि मोठा मुलगा दर्शन यांचा कुसुंब्याजवळ अपघात झाला होता. यामध्ये दर्शनच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून त्यावेळेस तो तब्बल १८ दिवस कोमात होता. तर लहान मुलगा जय हा ११ वर्षाचा असून तो आळंदी येथे वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेत आहे. घरातील कर्त्या व्यक्तीवर दुर्देवी काळाने झडप घातल्यामुळे वाघ कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मृत्यूच्या वार्ता ऐकताच कुटुंबियांना मानसिक धक्का

सकाळी नेहमीप्रमाणे योगेश वाघ हे कामासाठी घरातून बाहेर पडल्यानंतर त्याच परिसरातील मंदिरात दर्शन घेत होते. त्यानंतर त्याच राहणारा त्यांचा जिवलग मित्र भोला राजपूत याला भेटूनच पुढील कामासाठी मार्गस्थ होत असल्याचा त्यांचा नित्यक्रम होता. बुधवारी सकाळी देखील ते भोला राजपूतला भेटून सतिष मोरे यांच्या घरी इलेक्ट्रीक दुरस्तीचे काम करण्यासाठी गेले. परंतू शॉक लागून त्यांच्या मृत्यूची बातमी दुपारी समजल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला होता. आई वडीलांचा एकुलता एक आधार गेल्यामुळे त्यांना देखील अश्रू अनावर झाले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonThackeray faction's division chief dies after suffering an electric shock

Related Posts

गुन्हे

दोन घरफोड्या; ५१ हजारांचा ऐवज लंपास

October 28, 2026
गुन्हे

महामार्गाने घेतला १३वा बळी, बायपासवर मृत्यूचे सत्र थांबेना !

October 28, 2026
जळगाव

जेडीसीसीची रणधुमाळी सुरू, पहिल्याच दिवशी ३१४ अर्जाची विक्री

October 27, 2026
गुन्हे

किनगाव दगडफेकप्रकरणी शंभरहून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल

October 27, 2026
जळगाव

महावितरणच्या अभियंत्यांनी जपली सामाजिक बांधिलकी!

October 27, 2026
गुन्हे

धरणगावात घरफोडी; पाच संशयित सीसीटीव्हीत कैद

October 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्ह्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली महा स्वच्छता अभियान !

January 16, 2024

नशिराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात प्रवेशोत्सव

December 1, 2021

एक विवाह ऐसा भी : पितृछत्र हरवलेल्या दुर्गाच्या लग्नात शिवनेरी फाउंडेशनची स्नेहाची शिदोरी !

April 28, 2024

माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत नो मास्क नो एन्ट्री

November 7, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group