TheClearNews.Com
Tuesday, October 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महावितरणच्या अभियंत्यांनी जपली सामाजिक बांधिलकी!

राज्यातील ६ लाख १९ हजार विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षेचे धडे अन् हरित ऊर्जेचा जागर

vijay waghmare by vijay waghmare
October 27, 2026
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) : एरवी राज्याला प्रकाशमय ठेवण्यासाठी रात्रंदिवस राबणाऱ्या महावितरणच्या अभियंत्यांनी यंदा संवेदनशीलतेने सामाजिक बांधिलकी जपत भावी पिढीच्या विद्युत सुरक्षेचा नवा अध्याय लिहिला. विद्यार्थ्यांमध्ये विद्युत सुरक्षा, हरित ऊर्जा आणि वीज बचतीबाबत जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने अभियंत्यांनी राज्यातील तब्बल २ हजार ९१४ शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष जाऊन सुमारे ६ लाख १९ हजार विद्यार्थ्यांचे सादरीकरण व थेट संवादाद्वारे प्रबोधन केले. या विशेष उपक्रमादरम्यान शैक्षणिक संकुलांमध्ये विद्युत सुरक्षेचे पोस्टर्स, फ्लेक्स आणि माहितीपत्रकांद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

विद्युत यंत्रणेविषयी योग्य माहिती नसल्याने राज्यात लहान मुले आणि विद्यार्थ्यांचे विद्युत अपघात होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. यावर उपाय म्हणून महावितरणकडून यंदा अभियंता दिन व गणेशोत्सवाचे औचित्य साधून विद्युत सुरक्षा व हरित ऊर्जा प्रबोधन अभियान राबविण्यात आले. यामध्ये विद्युत सुरक्षेचे चित्रमय सादरीकरण, माहितीपत्रके आणि विविध प्रात्यक्षिके यासह विजेची निर्मिती व तिचा प्रवास कसा होतो यासह ऊर्जा बचत आणि ‘विकसित भारत २०४७’ या ध्येयासाठी भावी पिढीला हरित ऊर्जेचे महत्त्व समजून सांगण्यात आले.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 27 ऑक्टोबर 2026 !

धरणगावात घरफोडी; पाच संशयित सीसीटीव्हीत कैद

मा. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्या मार्गदर्शनात संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार आणि कार्यकारी संचालक श्री. परेश भागवत यांच्या पुढाकाराने या अभियानाचे आयोजन करण्यात आले. दि. १५ ते ३० सप्टेंबर या कालावधीत राज्यभरातील २ हजार ९१४ शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील सुमारे ६ लाख १९ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत महावितरणच्या अभियंत्यांनी अत्यंत सोप्या भाषेत, रंजक प्रसंगांतून आणि चित्रांच्या माध्यमातून ‘विद्युत सुरक्षा, हरित ऊर्जा व ऊर्जा बचत’ या विषयांवर प्रबोधन केले. या सादरीकरणानंतर बहुतांश शाळांमध्ये विजेचा प्रवास, विद्युत सुरक्षा आणि हरित ऊर्जेबाबत प्रश्नोत्तरांचे तास रंगले. तसेच अनेक शाळांमध्ये विद्युत सुरक्षेच्या विषयांवर चित्रांमध्ये रंग भरण्याची स्पर्धा घेण्यात आली.

या अभियानातील सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे, पुणे येथील ‘द पुना स्कूल अँड होम फॉर द ब्लाईंड’ या शाळेमध्ये अभियंत्यांनी विद्युत अपघाताबाबत अंध विद्यार्थ्यांना आवाज, स्पर्श आणि गंधाद्वारे संभाव्य विद्युत अपघाताचा धोका कसा ओळखावा याचे अत्यंत संवेदनशीलतेने प्रात्यक्षिक दिले. संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनीही जळगाव येथे विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले.

राज्यभरात राबवण्यात आलेल्या या अभियानात कोकण प्रादेशिक विभागात सर्वाधिक ९४६ शाळांमध्ये २ लाख १४ हजार विद्यार्थ्यांना, नागपूर प्रादेशिक विभागात ८९९ शाळांमध्ये १ लाख ७१ हजार विद्यार्थ्यांना, पुणे प्रादेशिक विभागात ८२७ शाळांमध्ये १ लाख ६९ हजार विद्यार्थ्यांना आणि छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागात २४२ शाळांमध्ये ६५ हजार विद्यार्थ्यांना थेट संवादाच्या माध्यमातून विद्युत सुरक्षेचे व हरित ऊर्जेची माहिती दिली.

विद्युत सुरक्षा व बचत आणि हरित ऊर्जेची पेरणी करणाऱ्या महावितरणच्या या उपक्रमाचे राज्यभरातील शिक्षक, पालक आणि शिक्षण क्षेत्रातून जोरदार स्वागत करण्यात आले. महावितरणमधील अभियंत्यांच्या या सामाजिक संवेदनशीलतेमुळे राज्यात शून्य विद्युत अपघाताच्या दिशेने व विद्युत सुरक्षेच्या जागराचे एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: _MSEDCL engineers uphold their social commitment!#jalgaon

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 27 ऑक्टोबर 2026 !

October 27, 2026
गुन्हे

धरणगावात घरफोडी; पाच संशयित सीसीटीव्हीत कैद

October 26, 2026
गुन्हे

जेवण बनवून न दिल्याने मद्यधुंद मुलाने केला आईचा खून

October 26, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 ऑक्टोबर 2026 !

October 26, 2026
जळगाव

महावितरणच्या क्रीडा स्पर्धेची निवड चाचणी उत्साहात जळगाव-नाशिक परिमंडलाच्या १६० कर्मचाऱ्यांची निवड

October 25, 2026
गुन्हे

कॉलेजला जातांना मुलीचा पाठलाग करीत विनयभंग

October 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

१२ कोटींचा जीएसटी बुडवला, ९० मक्तेदारांना दिली सिमेंटची ६५ कोटींची बनावट बिले ; चोपडा येथील व्यापाऱ्याला अटक !

August 2, 2024

ओबीसी आरक्षणा शिवाय निवडणुका नको ; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

December 15, 2021

धरणगाव ते पंढरपूर पायी दिंडी बुधवारी होणार रवाना !

May 28, 2023

बीएचआर घोटाळा : जितेंद्र कंडारेला पुन्हा चार दिवसांची पोलीस कोठडी !

December 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group