
जळगाव (प्रतिनिधी) – कॉलेजला जात असलेल्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन तिच्या घरासमोर येवून मी तुझा नवरा आहे म्हणत आरडाओरड केल्याचा प्रकार दि. २१ रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात पोस्कोतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
शहरातील एका भागात १७ वर्षीय मुलगी वास्तव्यास असून ती कॉलेजला जात असतांना संशयित प्रवीण दिलीप शेरमाळे उर्फ सोनू हटकर हा तिचा नेहमी पाठलाग करीत होता. दि. २१ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास प्रवीण शेरमाळेसह त्याचा मित्र ज्ञानेश्वर हटकर हे दोघ मुलीच्या घराबाहेर गेले. त्यांनी तिच्या घरासमोर येवून मोठमोठ्याने मी तुझा नवरा आहे असे म्हणत त्यांच्या घराच्या गेटला लाथा मारीत शिवीगाळ करु लागले. तसेच तुमच्या मुलाला जीवंत सोडणार नाही अशी धमकी देखील त्यांनी दिली. वारंवार होणारा त्रास असह्य झाल्यामुळे पीडितेने दि. २३ ऑक्टोंबर रोजी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित प्रवीण दिलीप शेरमाळे उर्फ सोनू हटकर (रा. रामेश्वर कॉलनी) व ज्ञानेश्वर हटकर यांच्याविरुद्ध पोस्कोतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
















