चोपडा (प्रतिनिधी) –
येथील भगिनी मंडळ संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एककाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर दत्तक गाव निमगव्हाण येथील तिर्थक्षेत्र श्री.धुनिवाले दादाजी मंदिर येथे ३० डिसेंबर ते ५ जानेवारी दरम्यान पार पडले.
या शिबिराचा समारोप ५ जानेवारी रोजी पार पडला, समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निमगव्हाण सरपंच दिनेश सपकाळे होते, त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून रासेयो स्वयंसेवकांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले व पुढे देखील रासेयो विभागाला गावाच्या वतीने सर्वोतपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
प्रमुख पाहुणे म्हणून श्री धुनिवाले दादाजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.धनराज पोपट पाटील, उपाध्यक्ष देवानंद लक्ष्मण पाटील, विश्वस्त तथा प्रमोद टेन्ट हाऊसचे संचालक श्री.राजेंद्र चौधरी, माजी उपसरपंच संजय बिऱ्हाडे, दिलीप पाटील (बाबा), संभाजी गोरख पाटील, लिलाधर बाविस्कर, नरेंद्र मैराळे, बँक ऑफ महाराष्ट्रचे कॅशियर जितेंद्र सपकाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिर समन्वयक म्हणून रासेयो कार्यक्रम अधिकारी सहा.प्रा.अनिल शिवाजी बाविस्कर तर महिला कार्यक्रम अधिकारी सहा.प्रा.एकता अग्रवाल यांनी जबाबदारी पार पाडली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून व रासेयो गीत गायनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
काही शिबीरार्थी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
विविध स्पर्धा व शिबिरात उल्लेखनीय कार्य करणारे विद्यार्थी व गटांना सन्मानित करण्यात आले.
श्री धुनिवाले दादाजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनराज पोपट पाटील, उपाध्यक्ष देवानंद पाटील, संभाजी पाटील यांनी देखील मनोगत व्यक्त केले. सर्वच मान्यवरांनी आपल्या मनोगतातून स्वयंसेवकांनी केलेल्या श्रमदानाबद्दल समाधान व्यक्त केले.
या सात दिवसीय शिबिराअंतर्गत दत्तक गावात विविध समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात आलेत, यात किशोरवयीन मुलींचे रक्तगट तपासणी शिबिर, बाहुली नाट्य सादरीकरण, एक मूठ धान्य संकलन अभियान, स्वच्छता अभियान, युवा संवाद, तापी नदी स्वच्छता, तिर्थक्षेत्र स्वच्छता, मतदार जनजागृती रॅली, बालविवाह निर्मूलन, प्लॅस्टिक मुक्त गाव, विविध सामाजिक विषायांवर प्रबोधनपर पथनाट्य सादरीकरण यासह सामाजिक व शैक्षणिक विषयांवर बौध्दिक व्याख्यानांच्या माध्यमातून वक्त्यांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.
रासेयो कार्यक्रम अधिकारी सहा.प्रा.अनिल बाविस्कर यांनी सूत्रसंचालन केले तर महिला कार्यक्रम अधिकारी सहा.प्रा.एकता अग्रवाल यांनी आभार मानले.
शिबिर यशस्वितेसठी भगिनी मंडळाच्या अध्यक्षा पूनम गुजराथी, सहसचिव अश्विनी गुजराथी, प्राचार्य डॉ.ईश्वर सौंदाणकर, प्रा.डॉ.आशिष गुजराथी, डॉ.संजय चौधरी, रासेयो संचालक डॉ.सचिन नांद्रे, जिल्हा समन्वयक डॉ.दिनेश पाटील, विभागीय समन्वयक डॉ.दिलीप गिऱ्हे यांचे सहकार्य लाभले.