धरणगाव (प्रतिनिधी) नगरपालिका हद्दीबाहेरील चिंतामण मोरया परिसरात अनेक नागरिक गेल्या ३० वर्षांपासून राहता आहेत. चिंतामण मोरया परिसर धरणगाव नगरपालिका हद्दीत येता नसल्यामुळे त्या भागातील लोकांना कोणत्याही प्रकारच्या नागरी सुविधा मिळत नाहीत. या भागात नवीन ग्रामपंचायत स्थापन करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. या आशयाचे निवेदन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना दिले.
चिंतामण मोरया परिसरातील गायत्री मंदिरात यासाठी नागरिकांची बैठक आयोजित केली होती. यावेळी धरणगाव बेघर संघर्ष समितीचे अध्यक्ष व्ही. एस. भोलाणे, समितीचे सचिव रवींद्र कंखरे, हरिअर पाटील, ज्येष्ठन निवृत्त शिक्षक दगडू सूर्यवंशी, निवृत्ता मुख्याध्यापक संजीवकुमार सोनवणे तसेच माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटीला आदी उपस्थित होते. निवेदन देताना चिंतामणी मोरया परिसरातील रमेशा महाजन, वाय. जी. पाटील, व्ही. बी. चौधरी यासह महिला व रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.