मुंबई (वृत्तसंस्था) प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार पुरस्कार विजेत्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. भारतीय प्रजासत्ताकाच्या ७२ व्या वर्धापनदिन सोहळ्याच्या पार्श्वभुमीवर आज हे पुरस्कार जाहीर झाले.
जळगाव येथील शिवांगी काळे हिने ‘वीरता’ या श्रेणीमध्ये, पुण्याच्या जुई केसकर हिने ‘नव संशोधन’ मध्ये आणि मुंबईतील जिया राय, तसेच नाशिकच्या स्वयंम पाटील याने ‘क्रीडा’ श्रेणीमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार पटकावला आहे. या सर्वांचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.