मुंबई (वृत्तसंस्था) पेट्रोल-डिझेल या इंधन दरवाढीवर चर्चेची मागणी संसदेत काँग्रेसने केली. मात्र, काँग्रेसची मागणी मान्य न झाल्याने काँग्रेसने जोरदार हंगामा केला. त्यामुळे झालेल्या गोंधळानंतर संसदेच्या राज्य सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे.
तेलाच्या वाढत्या किंमतींबाबत काँग्रेसच्या खासदारांनी सभागृहात घोषणा दिल्या नंतर राज्यसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. पहिल्यांदा कामकाज ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. पुन्हा केवळ ४ मिनिटांचे कामकाज झाले. त्यानंतर १ वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आले. या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू म्हणाले, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून मी मल्लिकार्जुन यांचे स्वागत करतो. ते देशातील प्रदीर्घ कामकाज नेत्यांपैकी एक आहेत. मी सर्व सदस्यांना सभागृहात उपस्थित रहाण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, जेणेकरून येथे होणाऱ्या चर्चेमध्ये सभागी होतील आणि त्यांनी आपल्या ज्ञानात भर टाकावी वाढेल.’ मात्र, विरोधक घोषणा देत राहिले. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, पेट्रोल आणि डिझेलच्या दराबाबत चर्चा झाली पाहिजे. पेट्रोल जवळापस १०० रुपये तर डिझेल ८० आणि एलपीजीच्या किंमती सतत वाढत आहेत. तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे संपूर्ण देश त्रस्त आहे. त्यामुळे यावर चर्चा व्हायला हवी यावर शेतकरी नाराज आहेत, असेही मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.