नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात खूप असे नेते आहेत जे निडर आहेत, पण काँग्रेसमध्ये नाहीत. या नेत्यांना पक्षात आणलं पाहिजे. जे भाजपाला घाबरतात अशा काँग्रेसी नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली पाहिजे, अशा कडक शब्दात राहुल गांधी यांनी काँग्रेस सोडणाऱ्या नेत्यांना सुनावलं आहे. पक्षाच्या सोशल मीडिया यूनिटच्या बैठकीत ते बोलत होते.
खासदार राहुल गांधी म्हणाले की, देशात खूप असे नेते आहेत जे निडर आहेत, पण काँग्रेसमध्ये नाहीत. या नेत्यांना पक्षात आणलं पाहिजे. जे भाजपाला घाबरतात अशा काँग्रेसी नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली पाहिजे. आम्हाला अशा नेत्यांची गरज नाही. जे आरएसएसच्या विचारधारेवर विश्वास ठेवतात. आम्हाला निडर लोकांची गरज आहे असं त्यांनी सांगितले.
खूप सारे लोक आहेत जे घाबरत नाहीत. त्या सगळ्यांना काँग्रेसमध्ये आणावं. जे आमच्याकडे घाबरतात त्यांनी बाहेर पडावं. तुमची गरज नाही, RSS मध्ये जा, आम्हाला निडर लोकांची गरज आहे. ही आमची आयडियोलॉजी आहे असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांच्या या विधानामागे ज्योतिरादित्य शिंदे आणि जितीन प्रसादसारखे नेते होते जे अलीकडेच भाजपात सहभागी झाले आहेत. काँग्रेसमध्ये राहून ज्यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला आहे अशांना राहुल गांधींनी स्पष्ट इशाराच दिला आहे. पक्षाच्या नेतृत्वाबद्दल काँग्रेसमध्ये जी २३ नेत्यांचा गट बनला होता त्यांच्यावरही राहुल गांधींनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.