जळगाव (प्रतिनिधी) अर्णब गोस्वामी विरोधात कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाअध्यक्ष अॅड. संदीप सुरेश पाटील यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. अर्णब गोस्वामीला तात्काळ अटक करा, कडक कारवाई करा अशी मागणी जिल्हा काँग्रेस ने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून केली आहे.
रिपब्लिक टीव्ही चे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हाट्सअप चॅट मधून अनेक गंभीर बाबी उघड झालेल्या आहेत. विशेषतः पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोट वर भारताने हवाई हल्ला केला. या कारवाईची माहिती अर्णब गोस्वामी यांना घटनेच्या तीन दिवस आधीच होती असे या संभाषणातून स्पष्ट होते. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत गोपनीय व संवेदनशील माहिती गोस्वामी यांच्याकडे कशी आली? देशाच्या संरक्षणविषयक महत्त्वाची माहिती बाहेर येणे हे अत्यंत गंभीर असून लष्करी कारवाई संदर्भातील माहिती बाहेर कशी आली? ही माहिती पत्रकारिता क्षेत्रातील अर्णब गोस्वामी यांना तीन दिवस आधी येणे म्हणजे २३ फेब्रुवारी २०१९ रोजी कशी मिळाली? त्यांनी अजून कोणाला ही माहिती दिली का? तसेच त्याने स्वतः सांगितले की ज्याने त्याला ही माहिती दिली तो मोदी सरकार मधील मोठा व्यक्ती आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी होणे गरजेचे आहे. अर्णव गोस्वामी ला तात्काळ अटक करा, कडक कारवाई करा अशी मागणी जिल्हा काँग्रेस ने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून केली आहे.
अर्णब गोस्वामी यांचे हे कृत्य ऑफिशियल सीक्रेट्स ॲक्ट १९२३ सेक्शन ५ नुसार कार्यालयीन गोपनीयतेचा भंग करणारे तर आहेच. पण हा देशद्रोहाचा प्रकार आहे. म्हणून अर्णब गोस्वामी ला तात्काळ अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी काँग्रेसने केलेली आहे. अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या रिपब्लिक टीव्हीने अनेक बेकायदेशीर कृत्य केले असून दूरदर्शन सॅटॅलाइट ची फ्रिक्वेन्सी बेकायदेशीर वापरून प्रसार भारतीचे कोट्यावधी रुपयांचे नुकसानही केले आहे. रिपब्लिक टीव्ही दूरदर्शनला पैसे न देता त्यांच्या फ्रिक्वेन्सी वापरणे हा गुन्हा आहे. हा गुन्हा टीआरपी घोटाळ्याची चौकशी करताना या बेकायदेशीर कृत्याची ही चौकशी होणे गरजेचे आहे. दूरदर्शन माहिती व प्रसारण मंत्री राज्यवर्धन राठोड यांच्याकडे यासंदर्भात तक्रार केली असता राठोड यांनी ती तक्रार दुर्लक्षित केली आहे असे या संभाषणातून दिसून येत आहे. याचा अर्थ मोदी सरकारचा गोस्वामी ला पाठिंबा आहे आणि जनतेचा पैसा लुबाडणाऱ्या अर्णब गोस्वामी विरोधात केंद्र सरकार तात्काळ कारवाई का करत नाही.
व्हाट्सअप चॅट वरून अर्णब गोस्वामी यांचे पंतप्रधान, गृहमंत्री यांच्यासह सरकारमधील मंत्र्यांची अत्यंत निकटचे संबंध असून त्यांनी त्याला नियमांच्या पलीकडे जाऊन व्यावसायिक मदत केली असल्याचेही स्पष्ट होत आहे. त्यासोबतच पुलवामा हल्ला हा मोठ्या व्यक्तीच्या फायद्याचा आहे. तो निवडणूक जिंकेल असा उल्लेखही या चॅटमध्ये आहे. त्यामुळे भाजपने निवडणूक जिंकण्यासाठी शहीद जवानांच्या बलीदानाचा वापर केला का? याचे उत्तरही केंद्र सरकारने दिले पाहिजे. अर्णब गोस्वामी आणि केंद्रातील भाजप सरकारचे साटेलोटे हा माध्यम स्वातंत्र्य आणि देशाची सुरक्षा आणि लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे. या सर्व प्रकरणात एकटा अर्णब गोस्वामी दोषी नाही तर केंद्र सरकारमधील अनेक मंत्र्यांनी घेतलेल्या शपथेचा भंग करुन गोस्वामी चा व्यवसाय फायदा करून दिल्याचे तसेच त्याला कायद्याच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. हा सुद्धा राष्ट्रद्रोहाचा भाग असून या प्रकरणात गोस्वामी ला मदत करणाऱ्या उच्चपदस्थांवर देखील तात्काळ कारवाई केली पाहिजे.
या मागणीसाठी आज रोजी दु २.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हाअध्यक्ष अॅड.संदीप सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली धरणे आंदोलन करण्यात आले असून यांच्या समवेत डॉ. उल्हास पाटील, डी. जी. पाटील, राजीव पाटील, दिलीपसिंग पाटील, भगतसिंग पाटील, ऍड. अविनाश भालेराव, देवेंद्र मराठे, मनोजकुमार सोनवणे, प्रा. हितेश पाटील, सचिन सोमवंशी, संजय पाटील, राजाराम पाटील, के. डी. चौधरी, अशोक साळुंखे, रतीलाल चौधरी, पिरण अनुष्ठान, ईश्वर जंगले, शाम तायडे, प्रदीप सोनवणे, मुजीब पटेल, रामराव पाटील, विवेक नरवाडे, देवेन्द्रसिंग पाटील, जाकीर बागवान, जगदीश गाढे, जमील शेख, मुक्तगिर देशमुख, ज्ञानेश्वर कोळी, विष्णु घोडेस्वार, शंकर राजपूत, योगेश देशमुख, किरण पाटील, विकास वाघ, अल्ताफ खान, गोपाळ कुंभार, विजय वाणी, प्रकाश पाटील, संजय जमादार, महेंद्र पाटील, दिलीप शेंडे, गजानन पाटील, कैलास महाजन, डॉ. व्ही डी पाटील, प्रताप पाटील, विजय लाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.