वर्धा (वृत्तसंस्था) केंद्रातील भारतीय जनता पक्षाने लादलेले अन्यायी शेतकरी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी काँग्रेस आज शनिवार (३१ ऑक्टोबरला) राज्यव्यापी सत्याग्रह आंदोलन करण्यात येत असून काँग्रेसच्या राज्यव्यापी आंदोलनाला वर्ध्यातून सुरुवात झाली.
‘एक देश, एक बाजारसमीती’ या संकल्पनेला प्रोत्साहन देण्याचं हे कायदे असल्याचं सरकारचं म्हणणं असून या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना आपल्या मालाची विक्री कुठेही करता येईल, असा सरकारचा दावा आहे. या कायद्यांमुळे कृषी क्षेत्रही भांडवलदारांच्या किंवा कॉर्पोरेट कुटुंबाच्या हातात जाईल, आणि शेतकऱ्यांना याचा फटका बसेल, असं विरोधक म्हणत आहेत. याच मुद्द्यावरून आज काँग्रेसने राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात वर्ध्यामध्ये आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सत्याग्रह आंदोलन करणार आहेत. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात आज सेवाग्राम येथे कॉंग्रेसच राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात झाली आहे.
तसेच आंदोलनामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, यशोमती ठाकूर, महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील, महिला काँग्रेस प्रदेश अध्यक्ष चारुलता टोकस इत्यादी नेते उपस्थिती आहेत.
















