नशिराबाद (प्रतिनिधी) येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात संविधान दिन साजरा करण्यात आला. सर्व प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधान प्रतचे पूजन करण्यात येऊन प्रतिमेस माल्यअर्पण करण्यात आले.
त्यानंतर तुषार रंधे यांनी संविधान दिनाचे महत्व सांगितले. तसेच २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत झालेल्या अतिरेकीच्या भ्याड हल्यात जखमी झालेल्या शहीद सैनिक व निष्पाप नागरिकांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाचे नियोजन वैशाली भोळे व वर्षा नारखेडे यांनी केले त्यांना मुख्याध्यापक प्रविण महाजन यांचे मार्गदर्शन लाभले.