जळगाव (प्रतिनिधी) संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आबेडकर सामाजिक न्याय भवन येथे संविधान दिवस जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी कवीसंमेलनातून अनेक कवी कवयित्री आपल्या शब्दमाध्यमातून संविधानाची महती विषद केली.
बांनाई अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर नैशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअरच्या जळगाव शाखेने फुले, शाहू, आंबेडकर साहित्य मंच व समाजकल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने सदरचा कार्यक्रम आयोजित केला होता. संविधान दिनाच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्यातील अनेक कवी कवयित्री यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगावच्या साहित्य क्षेत्रातील मोठे नाव प्रसिद्ध कवी व लेखक व आकाशवाणीचे माजी कार्यक्रम अधिकारी भगवान भटकर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून अरुण वाणी कार्यलय अधीक्षक समाजकल्याण जळगाव उपअभियंता व्ही के तायडे, सी. डी. तायडे तसेच बानाईचे अध्यक्ष आर. जे. सुरवाडे आदी विराजमान होते. प्रमुख अतिथींच्या अध्यक्षांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून व सामुहिक संविधान प्रस्ताविकांचे वाचन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.
ज्योती राणे यांनी आपल्या मधुर आवाजात गीत गायन करुन प्रमुख अतिथी व सर्व उपस्थितांचे स्वागत केले. केवळ संविधानामुळेच सर्वसामान्यांचे अधिकार हक्क शाबूत आहेत संविधान नसते तर खूप अनर्थ काळा असता अश्या आशयाच्या कविता अनेक प्रसिद्ध कविंनी सादर केल्या. यात कवी सुखदेव वाघ, सचिन मौर्य, संतोष साळवे, किशोर नेवे, गोपाळ बागुल, आर. डी. कोळी, अशोक पारधे, निंबा बडगूजर आदी कवींनी उत्तम कविता सादर केल्या तर प्रसिद्ध गायक कवी ईश्वर वाघ यांच्या भीमगीताने तसेच भीमराव सोनवणे यांच्या गेय कवितेने व कवी प्रकाश पाटील यांच्या गायलेल्या कव्वालीने कार्यक्रमाची रंगत वाढवली. सुत्रसंचालनाची जबाबदारी प्रसिद्ध निवेदिका ज्योती राणे व गायक कवी ईश्वर वाघ या जोडीने बहरदारपणे पार पडली.
याप्रसंगी शितल शांताराम पाटील, ज्योती वाघ, ज्योती राणे, डाॅ सुषमा तायडे, पुष्पा साळवे, चित्रा भारत पगारे, गंगा सपकाळे, पाठक या कवयित्रींनी तेवढ्याच ताकदीच्या व आशय व्यक्त करणारऱ्या कविता सादर केल्या. अध्यक्ष कवी भगवान भटकर यांनी घटना तयार करतेवेळी बाबासाहेब यांना कीती यातना झाल्या, तो माईसाहेबांच्या भटकरांनी घेतलेल्या मुलाखतीच्या वेळीप्रसंग, श्रोत्यांसमोर उभा करताच श्रोत्यांनाही अभिमान वाटला चित्रा पगारे व बी. के. तायडे यांचा सत्कार करण्यात आला. ज्योती वाघ यांनी आभार प्रदर्शन करुन कार्यक्रमाची सांगता केली. या कार्यक्रमासाठी बानाईचे सुशांत मेढे, मनोहर तायडे, बी. के. तायडे, यु. जी. बोदडे, आर. जे. सुरवाडे, अजय निकम तसेच सुखदेव वाघ, ईश्वर वाघ, भिमराव सोनवणे, ज्योती वाघ, ज्योती राणे, चित्रा पगारे, शितल शांताराम पाटील, पाठक, गंगा सपकाळे गाढोदेकर यांनी परिश्रम घेतले.