TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव झुमकराम वाचनालय बांधकाम : पालिका प्रशासनाकडून न्यायालयात आधीच कॅव्हेट दाखल ; चर्चेला उधान !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 18, 2020
in कोर्ट, धरणगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील मध्यवर्ती भागात सुरु असलेले झुमकराम वाचनालय व व्यापारी संकुल बांधकामासंदर्भात धरणगाव पालिका प्रशासनाने न्यायालयात कॅव्हेट दाखल केल्यामुळे चर्चेला जोरदार उधान आले आहे. दरम्यान, या वाचनालय आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स बाबत अॅड.शरद माळी यांना माहिती देण्यास पालिका प्रशासनाने टाळा-टाळ केली होती. त्यामुळे अॅड.माळी यांनी नाशिक माहिती आयुक्तांकडे दाद मागितलेली आहे. तर दुसरीकडे संत सावता महाराज शिक्षण संस्थेने देखील या जागेवर दावा केला आहे. एकंदरीत संभाव्य न्यायिक लढा लक्षात घेता पालिका प्रशासन आधीच न्यायालयात पोहचले आहेत.

 

READ ALSO

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 08 ऑक्टोबर 2026 !

शहरातील मध्यवर्ती भागात सुरु असलेले झुमकराम वाचनालयाच्या बांधकामासंदर्भात कॅव्हेट अज्ञात व्यक्तीच्या संभाव्य हरकती विरुद्ध दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे या बांधकामावर स्टे मिळण्यासाठी कुणीतरी न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचे स्पष्ट आहे. अॅड.शरद माळी यांनी झुमकराम वाचनालयाच्या बांधकामासंदर्भात माहिती अधिकारात माहिती मागितली होती. माहिती न मिळाल्यामुळे अॅड. माळी यांनी नाशिक माहिती आयुक्तांकडे दाद मागितली आहे. तसे अॅड.माळी हे झुमकराम वाचनालय व व्यापारी संकुल बांधकामावर स्टे मिळविण्यासाठी याचिका दाखल करणार असल्याची देखील चर्चा होती. परंतु पालिका प्रशासनाने हा संभाव्य धोका लक्षात आधीच न्यायालयाकडे कॅव्हेट दाखल केले आहे. त्यामुळे बांधकामावर स्टे देण्यापूर्वी आता न्यायालयाला पालिका प्रशासनाची बाजू ऐकून घ्यावी लागणार आहे.

 

अॅड.शरद माळी यांनी पालिका प्रशासनाकडे ही मागितली होती माहिती 

पालिकेच्या ठरावाची प्रत. तसेच जागेचा सिटीसीएस उतारा, संपूर्ण आलेल्या निविदा सहित इस्टीमेटच्या प्रति, नगररचना विभागाची मंजुरी प्रत, आरसीसी ड्रॉईंग प्रत तसेच ज्या व्यक्तीला निविदा दिली आहे, त्या व्यक्तीचे संपूर्ण कायदेशीर जीएसटी आणि आयकर परताव्याची माहिती. त्याच बरोबर वेळोवेळी मटेरियल टेस्टिंग होत असल्याचा अहवाल, भूकंप प्रतिरोधक ड्रॉईंग, वाचनालय आणि शॉपिंग कॉप्लेक्स एकत्र बांधण्याचा संबंध काय? बाबत माहिती. गावाच्या लोकसंख्येनुसार क नगरपालिकेच्या वाचनालयाचे क्षेत्रफळ आवश्यकतेनुसार कमी अथवा जास्त असल्याबाबतची माहिती. सदरची जागा वाचनालयासाठी आरक्षित असल्याची माहिती. ठेकेदारास दिलेले आदेश याची माहिती अॅड.माळी यांनी माहिती अधिकारात मागवली होती. परंतू यातील फक्त काही मुद्द्यांची माहिती देण्यात आली तर इतर मुद्द्यांची माहिती देण्यात आलेली नव्हती.

 

जागेवर संत सावता माळी शिक्षण संस्थेचा दावा 

शहरातील मध्यवर्ती भागात सुरु असलेले झुमकराम सार्वजनिक वाचनालय आणि व्यापारी संकुलनातील दोन गट संत सावता माळी शिक्षण संस्थेसाठी आरक्षित होते. परंतू २००५ डीपी रीवाईज झाल्यानंतर हे आरक्षण संपुष्टात आले. तर दुसरीकडे झुमकराम सार्वजनिक वाचनालय आणि व्यापारी संकुलनाचे बांधकाम सुरु असलेल्या दोन गटांवर संत सावता माळी शिक्षण संस्थेसाठी आरक्षण होते. सन २०१२-१३ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन शिक्षण संस्थेला जागा भाडेतत्वावर देण्याबाबत ठराव मी नगराध्यक्ष असतांनाच केला होता, असा दावा माळी समाज पंच मंडळ सदस्य तथा संस्थेचे चेअरमन माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी केला आहे. अगदी संबंधित शिक्षण संस्थेला अंधारात ठेवून बांधकाम सुरु करण्यात आले आहे. पालिका प्रशासनाने यावर विचार करून व्यापारी संकुलातील एक संपूर्ण मजला शाळेसाठी राखीव करावा. अन्यथा शाळेला पर्यायी जागा द्यावी, असे देखील ज्ञानेश्वर महाजन म्हटले होते.

 

दरम्यान, बांधकामाबाबत कुणी न्यायालयात भविष्यात जाईल. म्हणून कॅव्हेट दाखल केली असल्याची प्रतिक्रिया धरणगाव पालिकेचे मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी सांगितले. तर पालिका प्रशासनाच्या मनात भीती आहे. त्यामुळे कुणी काहीच हालचाल केलेली नसतांना पालिकेने कॅव्हेट दाखल केली आहे. परंतु कॅव्हेट दाखल केले म्हणजे न्यायालय स्टे देणार नाही, असा अर्थ होत नाही. या प्रकरणात अनेक गंभीर चुका करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे मला खात्री आहे, जेव्हा मी याचिका दाखल करेल, त्यावेळी या बांधकामावर निश्चितच स्टे मिळेल, अशी प्रतिक्रिया अॅड.शरद माळी यांनी दिली आहे. तर झुमकराम वाचनालय व व्यापारी संकुलात असे काय गौडबंगाल आहे की, पालिका प्रशानासन आधीच न्यायालयात पोहचले आहे, यावर देखील गावात जोरदार चर्चा सुरु आहे.

 

कॅव्हेट म्हणजे काय? 

एखादं प्रकरण न्यायलयात येण्याची शक्यता असल्यास पक्षकार आपलं म्हणणं मांडण्याची संधी द्यावी अशी विनंती कोर्टाकडे करतो. त्यानंतर न्यायालयाकडून या प्रकरणाची थेट सुनावणी टाळली जाते. शिवाय पक्षकाराची बाजू ऐकून घेतल्याशिवाय कोर्ट कुठल्याही निर्णयावर स्थगिती देत नाही.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

October 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 08 ऑक्टोबर 2026 !

October 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 ऑक्टोबर 2026 !

October 7, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑक्टोबर 2026 !

October 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 ऑक्टोबर 2026 !

October 5, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 04 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2026 !

October 4, 2026
Next Post

आपला पगार किती, आपण बोलता किती? ; गोपीचंद पडळकरांचा संजय राऊतांना टोमणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Gold Price Today : सोन्याचा दरात वाढ ; जाणून घ्या..सोन्या चांदीचा लेटेस्ट दर

May 20, 2022

आर्यन खान भाग्यवान, कारण… : सतीश मानेशिंदे

October 30, 2021

शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्यासाठी २५०० मेगावॅटचे सौर ऊर्जा प्रकल्प !

January 4, 2023

सत्ताधाऱ्यांनी केळी विकास महामंडळ स्थापन केले नाही – आ. एकनाथराव खडसे

October 19, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group