पातोंडा ता. अमळनेर (प्रतिनिधी) येथील अमळनेर – चोपडा रस्त्यावरील वार्ड क्र. ४ ला लागून असलेल्या मोठ्या गटारीच्या बांधकामसंबंधी आमदार अनिल भाईदास पाटील यांना निवेदन दिले. या निवेदनाची आमदारांनी प्रत्यक्ष रीतीने दखल घेत वार्ड क्रमांक ४ येथील मोठया गटारीचे काम व बांधकाम विभाग यांच्याकडून कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
दोन दिवसांपूर्वी निवेदन माजी सरपंच सुनील गुलाबराव पवार, शिवाजी शिक्षण मंडळाचे वरिष्ठ क्लार्क राहुल पवार, प्रशांत पवार, प्रफुल्ल पवार, व वार्ड मधील नागरिकांनी आमदार यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले होते. त्या निवेदनाची आमदारांनी प्रत्यक्ष रीतीने दखल घेत वार्ड क्रमांक ४ येथील मोठया गटारीचे काम व बांधकाम विभाग यांच्याकडून कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
मोठी गटार नसल्याने नागरिकांना अनेक समस्याला समोरे जावे लागत होते. त्यामुळे आमदार अनिल पतील यांच्या सहकार्याने कमाला सुरुवात करण्यात आली. तसेच मोठया गटारीचे कामाच्या स्थळी उपस्थित पातोंडा पिंक संरक्षण सोसायटी चेअरमन नेहरू पवार, उपसरपंच नितीन पारधी, प्रशांत पवार, प्रफुल्ल पवार, राकेश पाटील, माजी ग्राम पंचायत सदस्य संजय पवार, अतुल पवार, निलेश पवार, हेमंत देशमुख वार्ड क्रमांक ४ मधील मोठया गटारीच्या कामास प्रारंभ झाल्याने सर्वांच्या उपस्थितिने कामाला सुरुवात करण्यात आली.