सांगली (वृत्तसंस्था) शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी कोरोनाला थोतांड असल्याचे म्हटले आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे यंदाही राज्य सरकारने पंढरपूरच्या वारीवर बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर ते सांगलीत प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते. ‘कोरोना म्हणजे थोतांड आहे. सरकार हे थोतांड का वाढवत आहे कळत नाही, हे सर्व देशात चाललेले षडयंत्र आहे’, असे संभाजी भिडे यावेळी म्हणाले.
देशात आणि राज्यातील कोरोना परिस्थितीवरून शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी शंका उपस्थित केली आहे. देशाच्या इस्लामिक स्वारांनी महाराष्ट्रला मातीत घातलं. महाराष्ट्रात आज भगवंतांचे नामकरण करत वारीला जाण्यासाठी बंदी घालण्यात आली. कारण वारीमुळे कोरोना वाढू शकतो. मात्र कोरोना म्हणजे थोतांड आहे आणि हे सरकार हा थोतांड का वाढवत आहे हे कळत नाही, असं संभाजी भिडेंनी म्हटलं.
पण या कोरोनामुळे आज देशात काय घडलं असेल, तर लोकांच्यामध्ये फक्त भीतीचं आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वारीला जर बंदी घातली नसती, तर देशात एकही उदाहरण मिळालं नसतं की कोरोनामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. माझं मत आहे की कोरोना हे षड्यंत्र आहे. देशाचा हे दुर्दैव आहे, असं मत संभाजी भिडे यांनी व्यक्त केले आहे. तर पंढरपूरच्या वारीला बंदी घातल्यानंतर वारकर्यांनी रस्त्यावर उतरायला हवे होतं, असंही त्यांनी म्हटलं.
















