TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेतकऱ्यांच्या पोटखराब जमीन वाहितीखाली आणण्यासाठी आणि त्याबाबत सातबारा उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याकामी जिल्हा प्रशासनाचे आवाहन

पोटखराब वर्ग अ मधील पोट नियमात सुधारणा

The Clear News Desk by The Clear News Desk
February 16, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) अनेक शेतकऱ्यांनी पोटखराब जमिनी सुधारणा करून लागवडीखाली आणलेल्या आहेत परंतु त्याबाबत अधिकार अभिलेखात नोंदी न घेतल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता त्यासाठी अधिकार अभिलेखात पोटखराब जमिनी लागवडीयोग्य झाले बाबत नोंदी घेण्यासाठी कार्यपध्दती विहित करुन त्या अनुषंगाने क्षेत्रीय महसूली अधिकारी व प्राधिकारी यांना दिशानिर्देश जारी करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कळविले आहे. त्यासाठी जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तहसील स्तरावर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे

पोटखराब जमिन वर्ग अ मध्ये शासनाकडील क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र.३६/ज-१ अ, दिनांक २९/०८/२०१८ च्या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावर निर्बंध) (सुधारणा) नियम, २०१८ नुसार महाराष्ट्र जमीन महसूल ( जमिनीच्या वापरावर निर्बंध) नियम, १९६८ च्या नियम 2 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्याबाबत खालीलप्रमाणे सूचना देण्यात आलेल्या आहेत:-

READ ALSO

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

१.तलाठी यांनी संबंधित गावातील सर्व सर्व्हे / गट नंबर निहाय पोटखराब वर्ग (अ) ची माहिती गाव नमुना नंबर ७/१२ वरुन तयार करावी.( परिशिष्ट -१ अ मधील रकाना क्र.१ ते ५)
२. त्यानंतर तलाठी यांनी गावच्या चावडीमध्ये अथवा दवंडीद्वारे कळवून / स्थळ पाहणी करण्यासाठी नोटीस पाठवाव्या. (परिशिष्ट -२)
३. तलाठी यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पोटखराब वर्ग (अ) क्षेत्र लागवडीखाली आणले असल्याची खात्री करुन तसा जबाब, पंचनामा व हस्तस्केच नकाशा तयार करावा.( परिशिष्ट -३)
४. त्यानंतर परिशिष्ट – १ अ मधील रकाना क्रमांक ६ मध्ये पोटखराब वर्ग (अ) क्षेत्र लागवडीखाली आणले आहे काय ? “होय / नाही” नमूद करावे. “होय” असल्यास रकाना क्र.७ मध्ये क्षेत्र नमूद करावे व जमीन धारकाने लागवडीखाली आणलेले पोटखराब वर्ग (अ) क्षेत्राबाबत वरील ‘वाचा १ व २ʼ नुसार खात्री करुन रकाना क्रमांक ८ मध्ये “पात्र / अपात्र” नमूद करावे.( परिशिष्ट -१ अ मधील रकाना क्र.६ ते ८)
५. त्यानंतर परिशिष्ट १ अ मधील पात्र स.नं./ गट नंबरची एकत्रित यादी परिशिष्ट १ ब मध्ये तयार करावी.
६. तलाठी यांनी परिशिष्ट- १ ब बाबतचा गावनिहाय अहवाल मंडळ अधिकारी यांचेकडे सादर करावा. (परिशिष्ट-४)
७. मंडळ अधिकारी यांनी ‍किमान १० % स.नं./ गट नंबरची स्थळ पाहणी करुन पडताळणीअंती ‍शिफारशीसह अहवाल तहसीलदार यांचेकडे सादर करावा. ( परिशिष्ट -५)
८. तहसिलदार यांनी गावनिहाय माहिती उपअधीक्षक भूमी अभिलेख यांचेकडे अभिप्रायासाठी पाठवावी. (परिशिष्ट-६)
९. उप अधिक्षक भूमी अभिलेख यांनी संबंधित सर्व्हे नंबर / गट नंबरच्या मूळ वर्गीकरण नकाशा (सर्व्हे नंबरचा गाव नकाशा, प्रतीबुक, प्रतफाळणीबुक,मोजणीबुक, इत्यादी) अभिलेखां वरुन गाव नमुना नंबर ७/१२ वर दर्शविलेले क्षेत्र हे पोटखराब वर्ग (अ) असल्याची खात्री करावी. तसेच आवश्यक अभिलेखांच्या प्रतीसह जरुर तर जागा पाहणी करुन व सुधारित आकारणी ठरवून ‍अभिप्राय तहसीलदार यांना पाठवावा.
(परिशिष्ट-७)
१०. तहसिलदार यांनी त्यांचे अभिप्रायासह अहवाल जिल्हाधिकारी / प्राधिकृत सक्षम महसूल अधिकारी यांच्याकडे सादर करावा. (परिशिष्ट-८)
११. जमीनधारकाने लागवडीखाली आणलेले क्षेत्र पोटखराब वर्ग (अ) मधील असल्याची खात्री झाल्यानंतर महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावर निर्बंध) नियम, १९६८ अंतर्गत महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावर निर्बंध) नियम, १९६८ अंतर्गत महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वारावर निर्बंध) सुधारणा नियम, २०१८ अन्वये सुधारित नियम २ (२) मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी / प्राधिकृत सक्षम महसूल अधिकारी यांनी अंतिम आदेश पारित करावा. (परिशिष्ट-९)
१२. जिल्हाधिकारी ‍/ प्राधिकृत समक्ष महसूल अधिकारी यांचेकडील आदेशानुसार उपअधीक्षक भूमी अभिलेख यांनी गावनिहाय कमी जास्त पत्रक मंजूर करुन तहसिलदार यांचेकडे गाव वहिवाटीस पाठवावे.
१३. जिल्हाधिकारी / प्राधिकृत सक्षम महसूल अधिकारी यांचेकडील आदेश व उपअधीक्षक भूमी अभिलेख यांचेकडील कमी जास्त पत्रकानुसार तलाठी यांनी अधिकार अभिलेखास गाव नमुना नं.१ व ७ मध्ये अंमल घ्यावा.
१४. उपरोक्तप्रमाणे कार्यवाही झाल्यानंतर त्या गावातील एखाद्या जमीनधारकाचा अर्ज प्राप्त झाल्यास त्यावरही याप्रमाणे कार्यवाही करावी असेही जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

June 21, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

June 21, 2026
गुन्हे

मित्राला थांबवून विचारपूस करणाऱ्यावर केली तुफान दगडफेक

June 21, 2026
गुन्हे

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

June 20, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

June 20, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 20 जून 2026 !

June 20, 2026
Next Post

एरंडोलजवळ भरदिवसा सराफ व्यापाऱ्याला लुटले ; ९ लाखांचा ऐवज लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भोसरी जमीन प्रकरण : सातबारा उताऱ्यानुसार ‘ती’ जमीन ‘एमआयडीसी’च्या मालकीची नाही ; विशेष न्यायालयाचे निरीक्षण !

October 16, 2021

दिशा सालियनच्या आई-वडिलांनी अखेर सोडलं मौन ; म्हणाले…!

February 22, 2022

जागतिक योग दिनानिमित्त योगयज्ञचे आयोजन, उडाण फाऊंडेशनचा सहभाग

June 21, 2021

बहिणीला भेटून गावाकडे परतणाऱ्या भावावर काळाचा घाला, भरधाव ट्रकने चिरडले !

November 28, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group