
पाचोरा (प्रतिनिधी) – तालुक्यातील एका गावातून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यातील पीडित मुलगी ही संशयित मुलासह कन्नड तालुक्यातील टापरगांव शिवारातील शेतात लपून बसलेले असल्याची गोपनीय व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पाचोरा पोलिसांना माहिती मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पो.नि. राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील, पो.कॉ. हरीश परदेशी, पो.कॉ. मजीद पठाण यांनी तत्काळ जावून शेतात लपून बसलेल्या पीडित मुलीस सुखरूप व तिला घेऊन येणाऱ्या संशयितास ताब्यात घेतले. पीडित मुलीस व विधी संघर्षग्रस्त बालकास पाचोरा पोलीस ठाण्यात आणले आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील करत आहेत. पीडित मुलगी सुखरूप सापडल्याने तिच्या कुटुंबियांनी पाचोरा पोलिसांचे आभार मानले असून, पाचोरा पोलिसांच्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
















