नवी दिल्ली (प्रतिनिधी) मागील २४ तासांमध्ये देशभरात ३८ हजार ७७२ नवे करोनाबाधित आढळले असून, ४४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशातील करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. याशिवाय करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही दररोज भर पडतच आहे. देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ९४ लाख ३१ हजार ६९२ वर पोहचली आहे. सध्या देशात ४ लाख, ४६ हजार ९५२ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर, करोनामुळे आतापर्यंत १ लाख ३७ हजार १३९ रुग्ण दगावले आहेत. याशिवाय करोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज मिळालेल्यांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. मागील २४ तासांमध्ये देशभरात ४५ हजार ३३३ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. यामुळे आतापर्यंत देशातील करोनामुक्त होऊन डिस्चार्ज मिळालेल्याची एकूण संख्या ८८ लाख ४७ हजार ६०० वर पोहचली आहे.