TheClearNews.Com
Friday, April 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत कोरोना लसीकरणाचा शुभारंभ

जिल्ह्यात दुपारी १२.३० वाजेपर्यंत ११४ आरोग्य सेवकांना देण्यात आली लस

The Clear News Desk by The Clear News Desk
January 16, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे कोरोना लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना परिचारीका कुमुद जवंगार यांनी पहिली लस दिली. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, अधिपरिचारीका के. एन. नेतकर, वैभव सोनार यांना लस देण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे, डॉ. जयकर यांच्यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयाचे अधिकारी, डॉक्टर, अधिपरिचारीका, कर्मचारी आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले की, देशाच्यादृष्टीने हा ऐतिहासिक क्षण आहे. कोरोना संकट काळात ज्यांनी धैर्याने कर्तव्य बजावले अशा आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रथम कोरोना लस देण्यात येत आहे. लसीकरणाच्या सहाय्याने अनेक आजारांवर देशाने नियंत्रण मिळविले आहे. जिल्ह्यात अद्यापही कोरोनाचे संकट असताना कोरोनाला कायमचे हद्दपार करण्यासाठी लसीकरण उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त करुन ते पुढे म्हणाले की, कोरोनाची लस आली असली तरी नागरीकांनी काळजी म्हणून मास्क वापरावा, सामाजिक अंतर पाळावे, नेहमी सॅनिटायझरचा वापर करावा असे आवाहनही त्यांनी केले. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यानंतर कोरोना काळात अधिक जोखीम असलेल्या कोरोना योध्दांचे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

READ ALSO

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

लसीकरणाचेवेळी कोरोना विषयक सर्व मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्राचा मार्गावर रांगोळी काढण्यात आली होती. को-विन ॲपवरील नोंदणीनुसार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र पाहून तसेच त्यांची थर्मलगन व ऑक्सीमीटरने तपासणी करण्यात येत होती. त्यानंतर त्यांना सामाजिक अंतर राखून प्रतिक्षा कक्षात बसविण्यात येत होते. कागदपत्रांची तपासणी करण्यात आल्यानंतर लसीकरण करण्यात येत होते. लसीकरणानंतर ॲपवर लसीकरण झाल्याची नोंद घेण्यात येत होती. लसीकरणानंतर कर्मचाऱ्यांना ३० मिनीटे तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली स्वतंत्र कक्षात ठेवण्यात येत होते. या‍ठिकाणी कुठल्याही प्रकारची अडचण उद्भवल्यास आरोग्याच्या सर्व सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. पालकमंत्र्यांनी प्रतिक्षा कक्षातील कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी शुभेच्छा देऊन निरीक्षण कक्षात लसीकरण झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशीही संवाद साधला.

जिल्हा रुग्णालयासह महापालिकेच्या डी. बी. जैन हॉस्पीटल, उपजिल्हा रुग्णालय, चोपडा आणि जामनेर तसेच ग्रामीण रुग्णालय, पारोळा व चाळीसगाव आणि न. पा. भुसावळ या ७ केंद्रांवर लसीकरणास मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. या सातही केंद्रावर दररोज १०० आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी सांगितले. जिल्ह्यात दुपारी १२.३० वाजेपर्यंत ११४ आरोग्य सेवकांना देण्यात लस आली. लसीकरणाच्या शुभारंभानंतर दुपारी १२.३० वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालयात २०, महापालिकेच्या डी. बी. जैन हॉस्पीटलमध्ये २०, उपजिल्हा रुग्णालय, चोपडा ०५, जामनेर ३२, तसेच ग्रामीण रुग्णालय, पारोळा १०, चाळीसगाव ०८, आणि न. पा. भुसावळ येथील केंद्रावर १९ असे एकूण ११४ आरोग्य सेवकांना कोरोनाची लस देण्यात आली. जिल्ह्यात कोरोनाची लस देण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या नेतृत्वात महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार, आयएमए चे डॉक्टरांसह जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा परिश्रम घेत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

April 9, 2026
धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
जळगाव

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात संपन्न

April 9, 2026
जळगाव

खरीप हंगाम २०२६: जळगाव जिल्ह्यात युरीया खतांची पहिली रेक दाखल

April 9, 2026
Next Post

बर्ड फ्ल्यु प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय सनियंत्रण कक्ष स्थापन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कॉंग्रेसचे उमेदवारही खडसे ठरवितात, एवढी मोनोपली जिल्‍हा बँकेत सुरू ; डी.जी. पाटलांचा आरोप (व्हिडीओ)

November 9, 2021

पोलिसांच्या चोख बंदोबस्तात वाहनांची कसून तपासणी

April 23, 2021

कर्नाटक राज्यातील लूट प्रकरणाचे यावल कनेक्शन, एक जण ताब्यात !

October 9, 2021

साक्षगंध सोहळा आटोपून परतणाऱ्या दोघांचा भीषण अपघातात मृत्यू !

November 17, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group