धरणगाव (प्रतिनिधी) बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने आज २८ नोव्हेंबर शनिवार रोजी कोविड-१९च्या काळात शहरातील ज्या शिक्षकांनी विविध चेक- पोस्टवर ड्युट्या केल्या होत्या. अशा सर्व शिक्षकांचा “कोरोना योद्धा” म्हणून सन्मान करण्यात आला.
सर्वप्रथम महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे बहुजन क्रांती मोर्चाचे तालुका संयोजक आबासाहेब राजेंद्र वाघ, छत्रपती क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांच्या हस्ते शिक्षण क्रांतीचे प्रणेते , सत्यशोधक महात्मा ज्योतीराव फुले व विद्येची देवता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
आजच्या दिवसाचे औचित्य साधून महात्मा फुले हायस्कूल धरणगाव, सा. दा. कुडे विद्यालय, पी. आर. हायस्कूल , इंदिरा गांधी विद्यालय , बालकवी ठोंबरे विद्यालय , आदर्श विद्यालय , अँग्लो उर्दू हायस्कूल या सर्व शाळेतील मुख्याध्यापकांचा विविध चेक पोस्टवर ड्युटी असणाऱ्या सर्व शिक्षकांचा बहुजन क्रांती मोर्चा धरणगांवच्या वतीने “कोरोना योध्दा सन्मानपत्र” देऊन सन्मान गौरविण्यात आले.
याप्रसंगी महात्मा फुले हायस्कूल च्या मुख्याध्यापिका सौ.पी.आर सोनवणे मॅम , पी.आर. हायस्कूल चे मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे, सा. दा. कुडे विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एस. पाटील , बालकवी ठोंबरे विद्यालयाचे मुख्याध्यापक जीवन पाटील , इंदिरा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.एस.पाटील, आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.जी. सोनवणे, अँग्लो उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक एस.जे.शेख अशा सर्व मुख्याध्यापकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी बहुजन क्रांती मोर्चाचे तालुका संयोजक आबासाहेब राजेंद्र वाघ, छत्रपती क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, बामसेफचे तालुकाध्यक्ष प्रमोद पाटील, उपाध्यक्ष हेमंत माळी, महासचिव आकाश बिवाल, प्रोटान शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष सुनिल देशमुख, भारत मुक्ती मोर्चाचे तालुका अध्यक्ष गौतम गजरे , भारत मुक्ती मोर्चाचे राज्य महासचिव मोहन शिंदे, दिपक बिवाल, रविंद्र गजरे, बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क चे तालुकाध्यक्ष निलेश पवार, समर्पण गृपचे अध्यक्ष महेंद्र तायडे, राष्ट्रीय किसान मोर्चाचे शहराध्यक्ष गोरख देशमुख, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे शहराध्यक्ष नगर मोमीन, मयूर भामरे, यांच्यासह बहुजन क्रांती मोर्चाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.