जळगाव (प्रतिनिधी) कोविड -१९ मध्ये कंत्राटी पद्धती सेवा बजावत याचा प्रतिकार करण्यासाठी मोलाची भूमिका पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांना आगामी वर्षातही पुनर्नियुक्ती देण्यात यावी अशी मागणी भाजपच्या वैद्यकीय आघाडीने राज्यपालांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना नव्याने नियुक्ती मिळावी यासाठी भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नि. तू. पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांच्याच पुढाकाराने आता याच मागणीचे निवेदन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देण्यात आला आहे.
कोरोना या महाभयंकर व जागतिक संघटनेने महामारी घोषित केलेल्या, साथरोग आटोक्यात आणण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्यातील आरोग्य यंत्रणा अपुरी पडते. तसेच covid-१९ चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने याला अटकाव करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि जिल्हा एकात्मिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेमार्फत ऑनलाईन जाहिराती प्रमाणे जी. एन. एम., ए. एन. एम, डाटा एंट्री ऑपरेटर, फार्मसिस्ट, डॉक्टर, सफाई कामगार, विविध टेक्निशियन, भांडारपाल, वार्ड बॉय आधी पदांची रोजंदारी पद्धतीने हजारोच्या संख्येने नोकरभरती केली गेली, पण या कोरोना योद्धाच्या विविध बाबींकडे वैद्यकीय आघाडी, भारतीय जनता पार्टी आपले लक्ष वेधू इच्छितो…!
1.संपूर्ण महाराष्ट्रातील covid-१९ च्या काळामध्ये जे जे आरोग्य सेवक, कोरोना योद्धा हे तात्पुरत्या पद्धतीने भरले गेले असतील,त्या सर्वांना पुढील अकरा महिन्यासाठी सलग पुनर्नियुक्ती देण्यात यावी. तसेच त्यांच्या कार्याचा यथोचित सम्मान करण्यात यावा. जवळ पास संपूर्ण महाराष्ट्रात १३ ते १५ हजार कोरोना आरोग्य सेवक आहेत.
2.आगामी काळात महाराष्ट्रातील आरोग्य खात्यामध्ये जेव्हा जेव्हा कायमस्वरूपी अथवा कंत्राटीभरती होईल तेव्हा या कोरोना योद्धांना त्यांच्या अनुभवानुसार त्यांच्या वैद्यकीय पदवी नुसार अग्रक्रम देण्यात यावा, त्यासाठी सर्वांची जिल्हानिहाय यादी करण्यात यावी. तसेच या कोरोना योध्यांच्या वारसांना आणि परिवाराला ज्या प्रमाणे जवान शहीद झाल्यावर शासकीय सवलती मिळतात त्याच धर्तीवर शासनाने यांना सवलती द्याव्यात. जेणेकरून आगामी काळात अस संकट पुन्हा आल्यास सर्व वैद्यकीय क्षेत्र जोमाने त्याचा प्रतिकरकरण्यासाठी उभी राहील.
3. कोरोना काळामध्ये कोरोना संक्रमणामुळे मयत झालेल्या कोरोना योध्यांचे प्रस्ताव शासन स्तरावर अडकलेले अडकलेले असून आजतागायत त्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत ५० लाखाचे मदत मिळालेली नाही. भुसावळ नगरपरिषद मधील स्वच्छता कर्मचारी स्वर्गवासी प्रकाश करणसिंग तुरकुले, वरणगाव मधील आरोग्य कर्मचारी स्वर्गवासी चंद्रभान काशिनाथ भोई यांची कागदपत्रे जोडलेली आहेत.
4. तसेच मयत झालेला कोरोना योध्यांच्या वारसांना लवकरात लवकर शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट करण्यात यावे यावर कुठलीही शासकीय कारवाई झालेली दिसत नाही आहे कागदपत्र सोबत जोडले आहे.
5. संपूर्ण महाराष्ट्रातील मृत्युमुखी झालेल्या करोना योध्यांना महाराष्ट्र शासनाने मरणोत्तर ‘शहीद” उपाधी देऊन सन्मानित करण्यात यावे. तसेच शहीद झालेल्या कोरोना योद्धाच्या नावे प्रत्येक तालुक्यात अथवा जिल्हा ठिकाणी”शहीद करोना स्मारक शिलालेख “उभारावा आणि त्यांच्या कार्याचा सम्मान करण्यात यावा, यासाठी वैद्यकीय आघाडी आग्रही आहे.
माननीय महामहीम वरील पाच मुद्द्यांवर यथायोग्य विचार करून लवकरात लवकर उचित कारवाई करावी ही नम्र विनंती…
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हे निवेदन देतांना भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अजित गोपछडे, डॉ. नि. तू. पाटील आणि डॉ. मेघना चौघुले यांची उपस्थिती होती. तसेच डॉ. अजित गोपछडे महाराष्ट्र वैद्यकीय आघाडीचे प्रदेश संयोजक, डॉ. नि. तु. पाटील, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. नरेंद्र ठाकूर, डॉ. धर्मेंद्र पाटील, डॉ. स्वप्नील मंत्री, डॉ. बाबासाहेब हरपले, डॉ. स्मिता काळे, डॉ.राहुल कुलकर्णी, आदी वैद्यकीय आघाडी शिष्टमंडळाने भेट घेत निवेदन दिले.
















