TheClearNews.Com
Thursday, July 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

“ स्वच्छता ही सेवा ” ही मोहिम लोकचळवळ व्हावी : ना. गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन !

जिल्हास्तरीय स्वच्छता पंधरवड्याचा शुभारंभ; २ ऑक्टोबर पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन

The Clear News Desk by The Clear News Desk
September 16, 2022
in जळगाव, धरणगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) : राज्य शासनातर्फे स्वच्छता ही सेवा मोहिम राबविण्यात येत असून याच्या अंतर्गत आजपासून २ ऑक्टोंबरपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात जिल्ह्यातील प्रत्येकाने सहभागी होऊन याला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त व्हावे असे आवाहन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ना. पाटील यांच्या हस्ते तालुक्यातील सावखेडा खुर्द येथे स्वच्छता ही सेवा या मोहिमेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. या मोहिमेच्या अंतर्गत येत्या १५ दिवसांमध्ये जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, या मोहिमेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात ना. गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत सर्वांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. तर ना. गुलाबराव पाटील यांनी सावखेडा फाटा ते सावखेडा गाव या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासह गावाला इलेक्ट्रीक घंटागाडी व शाळेला संगणक देण्याची घोषणा केली.

राज्य शासनातर्फे प्रत्येक जिल्ह्यात १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर २०२२ च्या दरम्यान “ स्वच्छता ही सेवा ” मोहिम राबविण्याचे जाहीर केले आहे. जळगाव जिल्ह्यात या मोहिमेचा शुभारंभ जळगाव तालुक्यातील सावखेडा खुर्द या गावातील कार्यक्रमात करण्यात आले. राज्याचे पाणी पुरवठ व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या मोहिमेचे उदघाटन करण्यात आले.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

चाळीसगाव नगरपरिषदेसाठी २ अग्निशमन वाहन खरेदीसाठी १ कोटी ८० लाखांच्या निधीस शासनाची मंजुरी

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन अभियानाचे नियोजन प्रकल्प संचालक तथा सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा कुडचे, सरपंच उषाबाई सपकाळे, विकासो चेअरमन जितू पाटील, अरविंद सपकाळे, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, माजी सभापती जनाआप्पा पाटील, डॉ, कमलाकर पाटील, नारायणआप्पा सोनवणे, रवींद्र चव्हाण सर, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, तालुका कृषी अधिकारी श्री राऊत आणि श्री. जंगले; केंद्रप्रमुख युवराज परदेशी, मुख्याध्यापक अरूण चौधरी, अनिल भोळे, गोपालजीभाऊ पाटील, पोलीस पाटील आनंदबापू पाटील, दिलीप आगीवाल, मच्छींद्र पाटील, घार्डी सरपंच लिलाधर पाटील, फुफणी सरपंच कैलास सपकाळे, आव्हाण्याचे सरपंच ज्ञानेश्‍वर चौधरी, विनोद सपकाळे, धानोरा सरपंच देवेंद्र पाटील, परिसरातील सरपंच, लोकप्रतिनिधी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, शिक्षकवृंद, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करून व दीप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर उपस्थितांना स्वच्छता व श्रमदानाची शपथ देण्यात आली. सूत्रसंचालन प्रवीण चौधरी सर यांनी केले. आभार गटविकास अधिकारी सुशांत पाटील, प्रास्ताविक प्रकल्प नियोजन संचालक स्नेहा कुडचे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी दृश्यमान स्वच्छतेबाबत सविस्तर माहिती. देऊन पंधरवाड्यात राबवायच्या उपक्रमांची माहिती दिली.

या कार्यक्रमात सुका कचरा व ओला कचरा याचचे संकलन करण्यासाठी ग्रामपंचायतीला कचराकुंड्या देण्यात आल्या. तर या कचर्‍याचे वहन करण्यासाठी सायकलींचे वाटप देखील करण्यात आले. अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांनी याप्रसंगी सादर केलेल्या विविध पाककृतींची पाहणी करून मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले. तर कार्यक्रमानंतर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, पाणी, स्वच्छता आणि आरोग्य हे आपल्या वैयक्तीक आणि सामूहिक जीवनातील तीन महत्वाचे घटक आहेत. उपलब्ध पाणी, स्वच्छता आणि आरोग्याच्या सुविधा या तिन्ही बाबी याचमुळे अतिशय महत्वाच्या आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रीतपणे २०२४ पर्यंत प्रत्येक घरापर्यंत पिण्याचे शुध्द पाणी पोहचवण्याचा संकल्प केलेला आहे. यालाच आता स्वच्छता ही सेवा या अभियानाची जोड मिळणार आहे. ग्रामीण आणि शहरी पातळीवर स्वच्छता ही महत्वाची आहे. यात सांडपाणी व्यवस्थापन, कचरा व घनकचरा व्यवस्थापन, गटारींसह मलनि:सारणाची व्यवस्था या बाबी अत्यावश्यक आहेत. या खात्यांचा मंत्री म्हणून मी या तिन्ही बाबींना गती देण्याचे प्रयत्न केले आहेत. स्वच्छता ही सेवा मोहिम याला बळ देणारी ठरावी ही अपेक्षा ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.

दरम्यान, स्वच्छता ही सेवा या मोहिमेच्या अंतर्गत येत्या १५ दिवसांच्या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे यात गावांमध्ये दृष्यमान स्वच्छता,गावातील कचराकुंड्या आणि असुरक्षित ठिकाणांची साफसफाई करणे, कचरा स्त्रोतांच्या ठिकाणी कचरा विलगीकरण करण्यासाठी जनजागृती करणे, कचरा संकलन आणि कचरा विलगीकरण करण्यासाठी केंद्र निर्माण करणे, प्लास्टिक सारखा अविघटनशील कचरा एकत्रित करून नियोजन करणे, पाणवठ्या जवळील परिसर स्वच्छ ठेवून त्यांच्या सभोवताली वृक्षारोपण, एकल प्लास्टिक वापराच्या दुष्परिणामाबद्दल सभा आयोजित करून यापूर्वी प्लास्टिक वापरावर बंदी बाबत घेतलेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे, हागणदारी मुक्त अधिक घटकांवर सरपंच संवाद आयोजित करणे, घोषवाक्य लेखन, प्रतिज्ञा घेणे, कचरा न करणे , प्लास्टिक बंदी व स्वच्छता या विषयावर वकृत्व निबंध, रांगोळी सजावट व देखावा स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी विविध मंडळांना आवाहन करणे यांचा समावेश राहणार असल्याची माहिती देखील ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक प्रवीण चौधरी यांनी केले तर आभार गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव नगरपरिषदेसाठी २ अग्निशमन वाहन खरेदीसाठी १ कोटी ८० लाखांच्या निधीस शासनाची मंजुरी

July 16, 2026
धरणगाव

प्रभाग 10 मधील जीर्ण मटण मार्केट स्थलांतरित करण्याची नगरसेवक गुलाब मराठे यांची मागणी…!

July 16, 2026
गुन्हे

भरधाव कारची रिक्षाला धडक; वरणगाव येथील युवक ठार

July 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 जुलै 2026 !

July 16, 2026
कृषी

शेतकरी बांधवांना मोठा दिलासा: किमान आधारभूत किमतीत ज्वारी खरेदीस मुदतवाढ!

July 16, 2026
Next Post

धक्कदायक : धमकी देत विवाहितेवर वारंवार बलात्कार ; मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रीकरणही केले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दुचाकीच्या भीषण अपघातात तरूण ठार; दुसरा गंभीर जखमी

July 21, 2024

पाळधीत 50 लाखाच्या गुटखा जप्त ; पाळधी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

January 25, 2026

पाचोरा : नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची ५ लाखांत फसवणूक !

August 23, 2022

त्याशिवाय बंडखोर एवढं धाडस करणार नाहीत : एकनाथराव खडसे !

June 27, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group