भुसावळ (डॉ. नि. तु.पाटील) मार्च २०२० मध्ये कोरोना महामारी महाराष्ट्रात थैमान घालत होती. कोरोना संक्रमित झाल्यावर खाजगी रुग्णालयात अवाच्या सव्वा बिल येणाच्या बाबी लक्षात आल्यावर महाराष्ट्र शासनाने महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत कॉविड-१९ च्या उपचारास मान्यता दि. २३ मे २०२० ला दिली. यामागील शासनाचा उदात्त हेतू हा की, गरिबांना मोफत वैद्यकीय सुविधा आणि उपचार मिळावेत, त्यासाठी स्वतंत्र खाटांची निर्मिती करण्यात आली’ पण, वस्तुस्थिती मात्र भिन्नचं होती.
जेव्हा कोरोना संक्रमित रुग्ण सदर नामनिर्देशन केलेल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले तेव्हा त्यांच्याकडून आधार कार्ड आणि रेशन कार्ड जमा करण्यात आले, शिवाय रुग्णांना उपचारासाठी पैसे देखील भरावे लागले, म्हणजे रुग्णांकडून उपचारासाठी पैसे वसूल करायचे आणि शिवाय सदर कागदपत्रे शासनाकडे जमा करून महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत परत प्रस्ताव सादर करायचे, याची शक्यता नाकारता येत नाही…? म्हणजे एका हाताने रुग्णांकडून वसुली आणि दुसऱ्या हाताने त्याच रुग्णांसाठी शासनाकडे प्रस्ताव…! हे म्हणजे, “दस उंगलीया घी मै और मुहँ कढई मैं…”
हीच बाब, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील वैद्यकीय कक्षाचे माजी प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी हेरत याबाबत औरंगाबाद उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवर ७ मे २०२१ ला निकाल देतांना उच्च न्यायालयाने ,” महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत ज्या खाजगी रुग्णालयात रुग्णांनी उपचार केले आणि त्यासाठी बिल आकारून पैसे घेतले,अश्या सर्व रुग्णालयांनी सदर रुग्णांना अथवा त्यांच्या परिवाराला पैसे परत करावेत,असें निर्देश महाराष्ट्र शासनाला दिले शिवाय संबंधित रुग्णांलयावर काय कारवाई केली?,याबद्दलसशासनाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.तसेच संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.”
आज मी स्वतः हा महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत कार्य करणाऱ्या अधिकारी वर्गाशी बोललो, तेव्हा त्यांच्या माहितीनुसार, “आजतागायत जळगाव जिल्हात जवळपास ५००० रूग्णांनी सदर योजनेअंतर्गत उपचार घेतले असून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित रुग्णांना जाब विचारला जात असून जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात संबंधित पात्र रुग्णांचे तक्रार दाखल करणे सुरू आहे”
आता आपल्याला काय करायचे आहे?
महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत ज्या खाजगी रुग्णालयात रुग्णांनी उपचार घेतला,
1. सदर रुग्णालयाचे बिल
2. मेडिकलच्या पावत्या
3. ऍडव्हान्स पैसे घेतल्याच्या पावत्या
4. इतर खर्च
5. रुग्णांचे आधार कार्ड
6. रुग्णांचे रेशन कार्ड आदी प्रमाणित छायाकित प्रति न्यायालयाने मंजूर केलेल्या फॉर्म सोबत भरून लवकरात लवकर जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करायचे आहे. ज्या लाभार्थी रुग्णांनी उपचारासाठी पैसे भरलेत, त्यांच्या फॉर्मची तपासणी झाल्यावर पुढील कारवाई होईल. (सदर फॉर्म सोबत/कंमेंट मध्येदिला आहे)
सर ते शेवटी एक सांगावसे वाटते,
कोरोना महामारीमध्ये काही जण हात “धुत” होते,
तर काही मात्र हात “धुवून’ घेत होते…!
व्यापक जनजागृती करून पाठपुरावा करणार…!
ज्या ज्या रुग्णांना अश्याप्रकारे मानसिक आणि आर्थिक त्रास झाला असेल त्या सर्वांनी आमच्याशी मो. 8055595999 संपर्क साधावा. यासाठी भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी व्यापक प्रमाणात जनजागृती करून सर्व पात्र रुग्णांना त्यांच्या बिलाची रक्कम परत मिळण्याची पाठपुरावा करणार.
डॉ. नि. तु. पाटील
उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक ,
वैद्यकीय आघाडी,भारतीय जनता पार्टी ,
महाराष्ट्र राज्य
मो.8055595999