TheClearNews.Com
Saturday, August 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खेळ छंद म्हणून जोपासा – भरतदादा अमळकर

जैन स्पोर्टस ॲकडेमीच्या समर कॅम्प -२०२५ चा समारोप

vijay waghmare by vijay waghmare
May 11, 2025
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – ‘आपण खेळ खेळतो मात्र त्यात बक्षिस मिळेलच असे नाही परंतू आनंद नक्कीच मिळेल, खेळभावना विकसीत होईल, आपल्या ध्येयाकडे करिअर म्हणून बघण्याचा संस्कार आपल्यावर संस्कारित होईल; त्यासाठी खेळ हा छंद म्हणून जोपासला जावा. आवडीने खेळले तर त्यात करिअर करता येते. असे मनात पक्के ठरवले पाहिजे तसे झाले तर मार्गही सापडतो, खेळाव्यतिरिक्त काय आवडते याचाही विचार आपण केला पाहिजे, असा सल्ला देत देशाच्या प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभा देवसिंग पाटील यांची बॅडमिंटनपटू ते राष्ट्रपती असा प्रेरणादायी प्रवास खेळाडूंसमोर केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरतदादा अमळकर यांनी उलगडून दाखविला.

जैन स्पोर्टस ॲकडमीचा समर कॅम्प – २०२५ चा समारोपाच्या पारितोषिक वितरण समारंभावेळी प्रमुख अतिथी म्हणून भरतदादा अमळकर बोलत होते. कांताई सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपिठावर जैन इरिगेशनचे मिडीया व्हाईस प्रेसिडेंट अनिल जोशी, जिल्हा बुध्दिबळ असोसिएशनचे सचिव नंदलाल गादिया, जैन स्पोर्टस ॲकडमीचे प्रशासकीय अधिकारी अरविंद देशपांडे, रविंद्र धर्माधिकारी, गिरीश कुळकर्णी उपस्थित होते.

READ ALSO

विद्यापीठ स्तरीय उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी सेवा गौरव पुरस्काराने संजय तोडे सन्मानित

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

जैन इरिगेशन सिस्टम्स लि., भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, अनुभूती स्कूल, कांताई नेत्रालय यांच्या सहकार्याने दि. १५ एप्रिल ते ११ मे पर्यंत समर कॅम्प चे आयोजन केले होते. क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुध्दिबळ, बास्केटबाल, तायक्वांडो, फुटबाॅल, कॅरम या क्रीडाप्रकारामध्ये ५८० खेळाडूंनी सहभाग घेतला. अनुभूती निवासी स्कूल, अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल सेंकडरी, कांताई सभागृह याठिकाणी समर कॅम्प चे आयोजन केले होते.

जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे नंदलाल गादिया यांनी सुद्धा मनोगत व्यक्त करून उन्हाळी प्रशिक्षण शिबीरात सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्यात. माती ओली असेल तर तिला आकार देता येतो त्याप्रमाणे उन्हाळी प्रशिक्षण शिबीरात खेळाडूंना घडविले जाते. जैन स्पोर्टस अकॅडमीतर्फे गेल्या २३ वर्षापासून हे सातत्याने सुरू आहे. शिस्त, वेळेचे महत्त्व, शारिरीक व मानसिक दृष्ट्या कणखर होऊन सर्वांगिण व्यक्तिमत्त्व घडविण्याचे काम समर कॅम्प मधून होत असल्याचे ते म्हणाले. महत्त्वाचे म्हणजे मोबाईल व टिव्ही वरील स्क्रिन टाईम मुलांचा खूप वाढला आहे. त्यातून मुलांना काहिअंशी बाहेर काढता आले याचेही समाधान आहे.
सुयश बुरूकुल यांनी समर कॅम्प विषयी आढावा घेतला. गिरीश कुळकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. वरूण देशपांडे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

समर कॅम्प मधील यशस्वी खेळाडू

न्हाळी प्रशिक्षण शिबीरात बॅडमिंटनमध्ये उत्कृष्ट खेळाडू भव्य रूणवाल, काव्या पाटील, अदव्य जोशी, स्मित सरोदे, मुकुंदा चौधरी, दुर्वा शिंपी, ऋग्वेदा सराफ, टेबल टेनिस मध्ये दरशील सोनवणे, बॉस्कटेबॉलमध्ये उत्कृष्ट खेळाडू म्हणून मुलींच्या मोठ्या गटातून अंकिता बिडकर, (लहान गट) डिम्पल कराळ, मुलांच्या गटात देवशेखर सोनार, विनित म्हसकर तर बुद्धिबळमध्ये कुशन चौधरी, गौरव बारी, मोनीश वागदे, काव्या चौधरी, प्रेरणा पाटील, विराट बोरसे, वंश सोनवणे, हर्षदा पाटील, फुटबॉलमध्ये उत्कृष्ट ट्रेनी द्रुवांकर पाटील, उत्कृष्ट खेळाडू विजय ठाकरे, आकांक्ष दिवारी, दीप सोनवणे, नाहुश वर्मा, तायक्वांडो मध्ये आराध्या पाटील, पुर्वेश विदाते, कोमल गाढे, मयूर पाटील, गुरु करांडे, कॅरममध्ये उत्कृष्ट ट्रेनी आरूषी सोलासे, उत्कृष्ट खेळाडू धिरज घुगे, अल्फेज पिंजारी, रिहान तलरेजा, साहिल सोनवणे, अप्रतिम घारगे, उदयोमुख खेळाडू म्हणून निधी शिरखे, तर क्रिकेटमध्ये उत्कृष्ट फलंदाज (मोठा गट) श्रेयश पोलभुने तर (लहान गट) रुद्रा लाडवंजारी यांना चषक, बॅट, ग्लोज ने सन्मानीत केले. उत्कृष्ट गोलंदाज (मोठा गट) स्पर्श बियाणी, (लहान गट) केशव मालु त्यांना शूज, बॉल व चषक, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हर्षल काळे, उत्कृष्ट विकेट किपर (मोठा गट) किरण निकम, (लहान गट) क्रिष्णा काबरा यांना चषकासह विकेट किपर ग्लोज, पॅड व क्रीडा साहित्याने गौरविले. तर समर कॅम्प मधील बेस्ट ट्रेनी ठरलेला यश पवार याचा चषकासह, बॅट, पॅड, ग्लोज, हेल्मटसह संपूर्ण किट देण्यात आले. मुलींच्या गटात उत्कृष्ट खेळाडू दिव्या शिंदे ठरली तिलासुद्धा सन्मानीत करण्यात आले. समर कॅम्प मध्ये जैन स्पोटर्स अकॅडमीमधील सर्व प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaon

Related Posts

जळगाव

विद्यापीठ स्तरीय उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी सेवा गौरव पुरस्काराने संजय तोडे सन्मानित

August 22, 2026
अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
जळगाव

महावितरणच्या शिबिरांत २८१ ग्राहकांचे ‘समाधान’

August 21, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
जळगाव

परिवर्तन तर्फे रविवारी ‘लेखकाचे अभिवाचन’ मध्ये प्रसिद्ध लेखक संतोष शिंदे यांचे अभिवाचन

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
Next Post

Today's horoscope : आजचे राशिभविष्य 12 मे 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिलासादायक : जळगाव जिल्ह्यात आज ५२ रुग्णांची कोरोनावर मात !

November 7, 2020

जिल्हा बँक निवडणूक : नाना पाटलांची याचिका फेटाळली ; खडसेंची बिनविरोध निवड निश्चित !

November 6, 2021

काय सांगता ! देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाला खडसेंच्या शुभेच्छा !

July 22, 2022

वल्गना नव्हे, आमचा प्रत्यक्ष कामांवर भर : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

October 31, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group