चोपडा (प्रतिनिधी) येथील मुस्तफा एज्युकेशन सोसायटी संचालित मुस्तुफा अँग्लो उर्दू प्रायमरी, हायस्कुल व ज्युनियर कॉलेजचा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम सोहळा उत्सहात पार पडला.
आजचे युग स्पर्धेचे युग, स्वछता अभियान, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या विषयावरील कार्यक्रम सादर झाले. विदयालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनास शाळेचे १२५० विदयार्थी व त्यांचे पालक शहरातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. लोकनूत्य, आदिवासी नूत्य, आईवर प्रेम आदी सांस्कृतीक कार्यक्रम सादर झाले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी (माजी अध्यक्ष विधानसभा महाराष्ट्र राज्य) तर उदघाटक म्हणून भैय्यासाहेब संदीप सुरेश पाटील (अध्यक्ष महात्मा गांधी शिक्षण मंडळ चोपडा), पंकज सुरेश बोरोले (संचालक,पंकज समूह, चोपडा) उपस्थित होते. सोबत संस्थेचे अध्यक्ष असगर अली महेबूब अली उपाध्यक्ष- लियाकत अली सैय्यद नूर, चेअरमन, सचिव, सर्व संचालक सर्व साधारण सभासद उपस्थित होते. प्राचार्य अब्दुल हक सर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक तन्वीर अहेमद शेख सर, डॉ. अजहर शेख सर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. सूत्रसंचलन उच्च माध्यमिक विभागातील प्रा. महेमूद शेख सर यांनी केले.