नागौर (वृत्तसंस्था) काही जणांना झोप अत्यंत प्रिय असते, तर काहीजण रविवारी संपूर्ण दिवस झोप घेतात. पण प्रत्येकाच्या झोपेला प्रमाण असते. कोणतीच व्यक्ती संपूर्ण २४ तास झोपू शकत नाही. पण राजस्थानमधील नागौर जिल्ह्यात गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या एका व्यक्तीची माहिती आहे. हा माणूस महिन्यातील तब्बल २० ते २५ दिवस झोप घेतो, म्हणजेच वर्षातून ३०० दिवस हा झोपलेलाच असतो.
या व्यक्तीचे नाव पुरखाराम असे आहे. ते ४२ वर्षांचे आहेत. तो राजस्थानमधील जोधपूर विभागात असलेल्या नागौर जिल्ह्याच्या परबतसर उपखंडातील भादवा गावात वास्तव्यास आहे. त्याचं एक किराणा मालाचं दुकानही आहे. पण त्याच्या झोपेच्या गंभीर आजारामुळे तो महिन्यातील केवळ पाचच दिवस ते उघडू शकतो. सुरूवातीला पुरखाराम जवळजवळ ५ ते ७ दिवस सलग झोपायचे. परंतु आता मात्रं सलग २५ दिवस तो झोपलेलेच असतात. त्याचं खाणं, पिणं, अंघोळ वगैरे सगळं तो झोपेतच करतो. त्याला टॉयलेट सीटवरही त्याच्या घरचे बसवून देतात. त्याच्या या गंभीर आजारामुळे त्याच्या घरचे अतिशय त्रासले आहेत. डॉक्टरांकडे नेल्यानंतर डॉक्टरांनी पुरखारामला असलेल्या एक्सिस हायपरसोम्निया या झोपेसंबंधित आजाराबद्दल सांगितले. तो या आजाराच्या शेवटच्या टप्प्यात मोडतो, ज्यामध्ये रूग्ण जवळजवळ काही आठवडे झोपेतून उठत नाहीत.
पुरखाराम यांची झोप वाढू लागताच नातेवाईक त्यांना डॉक्टरांकडे घेऊन गेले. मात्र सुरुवातीला डॉक्टरांना आजार लक्षात आला नाही. त्यानंतर पुरखाराम यांच्या झोपण्याचा कालावधी वाढतच गेला. आता ते अनेकदा २५ दिवस झोपतात. हा आजार अतिशय दुर्मिळ असल्याचं डॉक्टर सांगतात. हा आजार झाल्यावर व्यक्तीला सतत झोप येते. व्यक्तीला झोपेतून उठण्याची इच्छा असूनही शरीर त्याला साथ देत नाही. २०१५ पासून पुरखाराम यांचा आजार बळावला. २०१५ पर्यंत ते १८-१८ तास झोपायचे. मात्र आता ते २० ते २५ दिवस झोपतात.