मेष : रोजगार मिळण्याची संधी, मोठा ताण दूर झाल्यामुळे मनावरील ओझे दूर होईल. व्यवहार करताना काळजी घ्या. आजचा शुभ रंग – लाल
वृषभ : एखाद्या व्यक्तीकडून ठेवलेली अपेक्षा पूर्ण झाल्याने अपेक्षाभंग होईल. मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा. उत्पन्न स्थिर राहील. आजचा शुभ रंग – निळा
मिथुन : आज ताण तणाव वाढेल. जोडीदाराबद्दल चिंता वाटेल. गुंतवणूक करण्यासाठी चांगला दिवस. आजचा शुभ रंग – किरमीजी
कर्क : व्यवसायासाठी केलेला प्रवास सत्कारणी लागेल. धनार्जन होण्याची शक्यता. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. आजचा शुभ रंग – केशरी
सिंह : धर्मकार्यात मन लागेल. आयुष्याच्या प्रगतीसाठी केलेले प्रयत्न कामी येतील. नोकरीच्या ठिकाणी नव्या जवाबदार्या मिळतील. आजचा शुभ रंग – पांढरा
कन्या : गाडी चालवताना काळजी घ्या. उत्पन्न वाढण्याची शक्यता. धोका पत्करू नका. आजचा शुभ रंग – सोनेरी
तूळ : कोर्टाची कामे निकाली लागतील. दिवसभर चिंता जाणवेल. जोडीदाराचे प्रेम लाभेल. आजचा शुभ रंग – हिरवा
वृश्चिक : व्यवहार करताना धोका पत्करू नका. प्रेम प्रकरणात अनूकल दिवस आहे. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. आजचा शुभ रंग – पिवळा
धनु : चूक झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. हातातून मोठे काम होईल. घरात चिंतेचे वातावरण राहील. आजचा शुभ रंग – चंदेरी
मकर : मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल. विनाकारण धावपळ होईल. उत्पन्न स्थिर राहील. आजचा शुभ रंग – आकाशी
कुंभ : नोकरीच्या ठिकाणी प्रशंसा होईल. गुंतवणुकीसाठी चांगला दिवस. मित्रांसोबत चांगला दिवस जाईल. आजचा शुभ रंग – मोरपिशी
मीन : चांगली बातमी मिळण्याची शक्यता. उत्पन्न वाढेल. रागावर नियंत्रण ठेवा. आजचा शुभ रंग – नारिंगी
















