नागपूर (वृत्तसंस्था) राज्यात सध्या दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे आणि आता याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील आता प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. न घडलेल्या घटनेचे निषेध मोर्चे राज्यात निघत आहेत. हे धोकादायक असून, सरकारन गांभीर्याने घ्यावे, असे आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ते आज नागपूरमध्ये बोलत होते.
फडणवीस म्हणाले की, त्रिपुरा येथील कथित घटनेच्या निषेधार्थ अमरावती जिल्ह्यात मोर्चे काढण्यात आले. या मोर्चांनी वेगळेच वळण घेतले आहे. त्यात हिंदूंची घरे जाळजी जात आहेत. दुकाने टार्गेट केली जात आहेत. सोशल मीडियावर टाकलेल्या चुकींच्या फोटोमुळे हे मोर्चे काढण्यात येत आहेत. हे थांबायला हवे. शांतता राखणे गरजेचे आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले.
फडणवीस म्हणाले की, त्रिपुरामध्ये मशीद तोडल्याचे आणि जाळल्याचे फोटो प्रसिद्ध करण्यात आले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या चुकीच्या फोटोमुळे हे आंदोलन करण्यात येत आहे. हे आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न होत आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो. न घडलेल्या घटनेवरून होणाऱ्या आंदोलना हा प्रकार सरकारने गांभीर्याने घ्यावा. खरे तर शुक्रवारनंतर शनिवारीही अमरावतीमध्ये मोर्चे निघतच आहेत. यामुळे हिंसक वळण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून मोर्चेकऱ्यांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केल्यानंतर पाण्याचा मारा करावा लागला. अमरावतीत चांगलेच वादंग निर्माण झाले आहे. हे आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न होत आहे. शांतता राखणे गरजेचे आहे. आम्ही कुठल्याही दंगलीचे समर्थन करत नाही. सर्वांनी शांतता पाळावी, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, अमरावतीत आज कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. काल घडलेल्या हिंसाचारातील दोषींवर आधी कारवाई करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी येथील भाजप नेत्यांनी केली आहे. त्याशिवाय रस्त्यावर उतरलेला जमाव पांगणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. तसेच राज्यातील सरकारविरोधात सर्व पक्षांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन भाजप नेत्यांनी केले आहे.
















