जळगाव (प्रतिनिधी) शहरातील विवेकानंद नगरात तब्बल १ लाख ६२ हजाराचे सोने चांदीचे दागिने व रोख रक्कमेची चोरी झाल्याची घटना दि २५ रोजी उघड झाली आहे. याबाबत रामानंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, विवेकानंद नगरातील रहिवासी निलेश शेखर वारके(४०) हे त्यांच्या परिवारासह वास्तव्यास आहेत. दि २२ रोजीच्या सायंकाळी पासून ते २५ च्या सकाळपर्यंत कुणी तरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात दरवाजाचा कडी कोयडा तोडून घरात प्रवेश केला. यानंतर घरातील सोने-चांदीचे दागिने व रोक रक्कम चोरून नेल्याची तक्रार वारके यांनी रामानंद पोलिसात केली आहे. पुढील तपास पोउनि.गोपाल देशमुख हे करीत आहेत.