जळगाव (प्रतिनिधी) शहरातील आयोध्या नगर भागातील उषा ई. रेसिडेन्सीमधील फ्लॅटमध्ये अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करत सोने-चांदीच्या दागिन्यांसह एक लाखांची रोकड असा एकूण ३ लाख ९७ हजार ११७ रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Jalgaon Crime News)
या संदर्भात घरमालक सनी विकास सोनार (वय ३२) यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादनुसार दि. २ जानेवारीच्या सायंकाळी ५ : ४५ ते ७ : ४५ च्या दरम्यान, अज्ञात चोरट्याने मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. यानंतर बेडरूममधील लाकडी कपाटातील लॉकर तोडून त्यातील १ लाखांची रोकड आणि सोने-चांदीचे दागिने असा एकूण एकूण ३ लाख ९७ हजार ११७ रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी हे करीत आहेत.