जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेसाठी दर्शील सोनवणे हा विद्यार्थी चेन्नईसाठी नुकताच रवाना झाला आहे.
दि. २७ नोव्हेंबर २०२२ रोजी होणाऱ्या राष्ट्रीय अबॅकस २०२२ स्पर्धेसाठी जळगाव येथील सिप अबॅकस महाबळ शाखेचा विद्यार्थी चि. दर्शील सुधाकर सोनवणे (वय ९) हा नुकताच चेन्नईला रवाना झाला. सदर स्पर्धेत देशभरातील ३३०० विद्यार्थी सहभागी होणार असून या स्पर्धेत विद्यार्थ्यांची गणित सोडवण्याची अचूकता, स्मरणशक्ती, गणिते सोडवण्याचा वेग हा अचंबित करणारा थरार असतो. सदर स्पर्धेत दर्शील ५ मिनिटात १०० गणिते सोडवणार असून या स्पर्धेच्या तयारीसाठी सिप अबॅकस महाबळ शाखेच्या संचालिका स्वप्नाली पाटील यांनी परिश्रम घेतले असून आई-वडील व कुटुंबीय यांनी सरावासाठी मार्गदर्शन केले आहे. दर्शील यास सदर स्पर्धेसाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.