कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) पाळधी ता. धरणगाव येथील डी.सी.एच.सी. कोविड सेंटरला रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येत आहे. या सेवेत आपण सुद्धा खारीचा वाटा घ्यावा ह्या प्रेरणेतून कासोदा येथील सोमाणी कुटुंबीयांकडून पाळधी येथे ११ हजार १११ रुपयांचा सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया कासोदा शाखेचा धनादेश पाळधी येथील जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्याकडे देण्यात आला.
कोरोना काळात अनेक संस्था कोरोनाच्या रुग्णांसाठी मदतीचा हात पुढे करत आहेत. तर काही ठिकाणी कोविड सेंटर उभारण्यात आले असून त्यात पाळधी ता. धरणगाव येथील डी.सी.एच.सी.कोविड सेंटरला रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येत आहे. या सेवेत आपण सुद्धा खारीचा वाटा घ्यावा ह्या प्रेरणेतून कासोदा येथील गणपती शंकरलाल सोमाणी, राजेंद्र शंकरलाल सोमाणी व नयना सोमाणी या सोमाणी कुटूंबियाकडून आज दि. १८ एप्रिल २०२१ रोजी पाळधी येथे ११ हजार १११ रुपयांचा सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया कासोदा शाखेचा धनादेश पाळधी येथील जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्याकडे देण्यात आला.
त्याच बरोबर कोरोनाचा उपचार घेत असलेल्या प्रत्येक रुग्णांना मिठाईचा बॉक्स व पार्ले बिस्किट वाटप करण्यात आली. यावेळी पाळधी येथील अमोल कासट, धनराज कासट, उपसरपंच चंदन कमलकर, ग्रा.प.सदस्य उदय झंवर, माजी सरपंच अरुण पाटील, प्रशांत झंवर, मच्छिंद्र कोळी, चेतन झंवर, गणेश विनोद झंवर, निपाणे येथील राहुल हेडा तर कासोदा येथील केदारनाथ सोमाणी, गुणवंत पाटील, विलास मते आदी उपस्थित होते. सोमाणी परिवाराने केलेल्या या कामाचे सर्व दूर कौतूक होत आहे. गुलाबराव पाटील फाऊंडेशनतर्फे त्यांचे जाहीर आभार मानण्यात आले.
आज कोरोना रुग्णांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असून व गरीब रुग्णांना खाजगी रुग्णालयात उपचार करण्याची परिस्थिती नसते त्या रुग्णांचे उपचार पाळधी ता. धरणगाव येथील डी.सी.एच.सी. कोविड सेंटरला उपचार करण्यात येतात. तसेच खाजगी रुग्णालयात पैसा खर्च करून देखील अश्या प्रकारची रुग्णाची उत्तम देखभाल या ठिकाणी करण्यात येते. तर आपल्या कुटुंबाकडून या रुग्णांची सेवा व्हावी, अशी मनापासून इच्छा झाली म्हणुन त्यात आपलाही खारीचा वाटा व्हावा, असे कासोदा येथील गणपती शंकरलाल सोमाणी यांनी बोलून दाखवले.