TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात सत्यशोधक पद्धतीने दशपिंड व गंधमुक्ती

कर्मकांडांना छेद देत संत महापुरुषांच्या विचारांचा जागर; पी. डी. पाटील

vijay waghmare by vijay waghmare
January 13, 2026
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव ( प्रतिनिधी ) –  सर्वत्र वाढत्या अंधश्रद्धा, कर्मकांड आणि अनावश्यक धार्मिक खर्चाला ठाम नकार देत सत्य, विवेक, समता आणि मानवतावादी मूल्यांचा पुरस्कार करणारा सत्यशोधक पद्धतीने दशपिंड व गंधमुक्ती विधी चिंतामणी मोरया नगरात पार पडला. या कार्यक्रमातून राष्ट्रपिता, महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई यांच्या विचारांची प्रभावी मांडणी करण्यात आली. धरणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सदाशिव गिरधर महाजन यांचे पुतणे व माळी समाजाचे उपाध्यक्ष दिवंगत योगराज गिरधर महाजन यांचे चिरंजीव दिवंगत गणेश योगराज महाजन यांच्या गंधमुक्ती व उत्तरकार्याचा विधी सत्यशोधक पद्धतीने पार पाडण्यात आला. हा विधी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासह संत महापुरुषांनी समाजासाठी दिलेल्या विवेकनिष्ठ व मानवतावादी विचारांनुसार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात संत, महापुरुष व महामातांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. यावेळी सत्यशोधक समाजाचे विधीकर्ते शिवदास महाजन यांनी सत्यशोधक समाजाची प्रार्थना सामूहिक गायनातून सादर करून उपस्थितांमध्ये वैचारिक जागृती निर्माण केली. याप्रसंगी सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी. डी. पाटील यांनी उपस्थितांना सांगितले की, माणसाने जन्मभर कर्मकांडांचा गुलाम न राहता विवेकनिष्ठ विचार स्वीकारले पाहिजेत. सत्यशोधक विधी म्हणजे मृत्यूनंतरही माणसाच्या विचारांची उंची जपणारी प्रक्रिया आहे. न्याय, समता, स्वातंत्र्य व बंधुतेच्या मूल्यांवर उभा असलेला समाज घडवणे हीच संत-महापुरुषांच्या विचारांची खरी अंमलबजावणी ठरेल. यावेळी माळी समाजाध्यक्ष व्ही. टी. माळी, ज्येष्ठ पत्रकार कडू महाजन व गुलाबराव वाघ यांनी मनोगतातून दिवंगत गणेश महाजन यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. सत्यशोधक पद्धतीने विधी करण्याची प्रेरणा दिवंगत योगराज महाजन, भटुलाल महाजन, सत्यशोधक समाज संघाचे अध्यक्ष अरविंद खैरनार यांच्याकडून मिळाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
गंधमुक्ती कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे गायकवाड परिवाराने सामाजिक भान जपत शेत व परिसरात वृक्षारोपण केले. तसेच समाजसेवेचा वारसा पुढे नेत शालेय विद्यार्थ्यांना १०० शालेय दप्तर वाटप करण्याची घोषणा केली. या उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले. या कार्यक्रमाला माळी समाजाध्यक्ष रामकृष्ण महाजन, शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ, उपाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, दशरथ बापू, नगरसेवक निलेश चौधरी, भागवत चौधरी, विलास महाजन, हेमंत महाजन, गोरखनाथ देशमुख, लक्ष्मण पाटील, यशोदीप महाजन, दिपक महाजन, श्रीराम महाजन, जितेश महाजन, तेजस महाजन, विनायक महाजन, वासुदेव महाजन, कविराज पाटील, हेमंत माळी, पत्रकार राजेंद्र वाघ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी प्रास्ताविक आर. डी. महाजन यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमातून सत्यशोधक विचारांची प्रभावी मांडणी होत समाजात विवेकवादाची नवी दिशा मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

“मृत्यूनंतरही माणूस आपल्या विचारांनी जिवंत राहतो, सत्यशोधक पद्धतीचा संदेश” धरणगावातील हा कार्यक्रम केवळ विधीपुरता मर्यादित न राहता समाजाला अंधश्रद्धेपासून मुक्त करून विवेक, समता आणि मानवतेच्या मार्गावर नेणारा ठोस संदेश देणारा ठरला. कर्मकांडाऐवजी विचारांची परंपरा जपण्याचा हा प्रयत्न आजच्या काळात समाजासाठी दिशादर्शक ठरत आहे.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 सप्टेंबर 2026 !

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Daspind and Gandhamukti through Satyashodhak method in DharangaonDhrngoan

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 सप्टेंबर 2026 !

September 14, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 सप्टेंबर 2026 !

September 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 सप्टेंबर 2026 !

September 11, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 सप्टेंबर 2026 !

September 10, 2026
Next Post

शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने तरुणावर वार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भयंकर ! कुत्र्यानं अर्भकाचे लचके तोडून डोकं केलं धडा वेगळं ; पाहून रहिवाशांना बसला धक्का

March 14, 2022

धुळ्यात पोलिस अधीक्षकांनी उधळला जुगाराचा डाव ; 13 जुगारी ताब्यात !

November 25, 2023

कंडारी हत्याकांडातील मृतांची संख्या तीन ; जखमीचे उपचारादरम्यान निधन !

September 3, 2023

‘फादर्स डे’च्या दिवशीच बापाने पोटच्या मुलाचा केला खून ; धक्कादायक कारण आले समोर !

June 19, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group