धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील बांभोरी प्र.चा गावातील गोठाण भागात एका तरुणाला पूर्व वैमनस्यातून व नाचण्याच्या कारणावरून चाकूने पोटावर, मांडीवर, हातावर वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला होता. दरम्यान, यातील जखमी तरुणाचा उपचारादरम्यान, मृत्यू झाल्यामुळे आरोपींवर खुनाचे कलम वाढल्याची माहिती सपोनि गणेश बुवा यांनी दिली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, पूर्व वैमनस्यातून व नाचण्याच्या कारणावरून झालेल्या बोलाचाली वरून संगनमताने राहुल विजय कोळी (वय ३० रा. गोठाण वाडा बांभोरी प्र.चा.ता. धरणगाव) यांचे लहान भाऊ अतुल यास विजय नन्नवरे, संदीप नन्नवरे, ज्ञानेश्वर नन्नवरे यांनी चपटाबुक्कानी, लाथांनी मारहाण करून अजय नन्नवरे याने त्यांच्याजवळील चाकूने पोटावर, मांडीवर, हातावर वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील जखमी अतुल नन्नवरे (वय २६) याचा उपचारादरम्यान, आज मृत्यू झाला. त्यामुळे आता यातील आरोपींविरुद्ध खुनाचे कलम वाढले आहे. या चारही आरोपींना अटक केल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. दरम्यान, पुढील तपास सपोनि गणेश बुवा हे करीत आहेत.