नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा मोठी घट पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत ३ लाखांहून कमी नवीन रुग्ण सापडले आहेत. कालच्या दिवसात २ लाख ६३ हजार ५३३ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. मात्र कोरोनाबळींचा आकडा वाढला असून तब्बल ४ हजार ३२९ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.
आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाचा कहर सुरुच आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट दिसून येत आहे. मात्र, मृत्यू्चे प्रमाण अद्याप चिंतेचा विषय आहे. देशांत गेल्या २४ तासांत कोरोना संक्रमणामुळे ४३२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात मृत्यू झालेल्या रुग्णांची ही सर्वाधिक संख्या आहे. आज (मंगळवार), गेल्या २४ तासात कोरोनाचे २,६३,५३३ नवीन रुग्ण आढळले आहेत.
भारतात आतापर्यंत २,५२,२८,९९६ कोरोना केसेस आढळले आहेत. तर २,१५,९६,५१२ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडले आहे. २,७८,७१९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या भारतात ३३,५३,७६५ बाधित कोरोना रुग्ण आहेत.