धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव युनियन बँक ऑफ इंडिया शाखेचे व्यवस्थापक भूषण मोरे यांच्या मनमानी कारभार विरोधात बँकेच्या आवारातच शेतकऱ्याचे आमरण उपोषण दि. १९ सप्टे, २०२२ सोमवार पासून सुरू केले आहे. आज उपोषणस्थळीराष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष दीपक वाघमारेंनी भेट दिली. यावेळी श्री. वाघमारे यांनी जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांना संपूर्ण हकीगत सांगत या विषयात लक्ष घालण्याची विनंती केली. त्यावर देवकर यांनी लवकरच संबंधित शेतकऱ्याची अडचण सोडविण्याचे आश्वासन दिले.
शेतकरी योगेश रामलाल पुरभे (रा. मोठा माळी वाडा) धरणगाव हे युनियन बँक ऑफ इंडिया धरणगाव शाखेचे जुने खातेदार असुन प्रतिवर्षी शेतकरी पुरभे व त्यांच्या पत्नीच्या नावे शेतीसाठी नियमित पीककर्ज घेत होते व घेतलेल्या कर्जाची रक्कम नियमीत वेळेवर न चुकता बँकेला परतफेड केली आहे. परंतु मागील वर्षी निसर्गाने साथ न दिल्याने शेतात पीक आले नाही. परंतू त्यानंतर देखील त्यांनी २ फेब्रुवारी, २०२२ रोजी बँकेच्या आकडेवारीनुसार व्याजासकट कर्जफेड परतफेड केले. परंतू यानंतर युनियन बँकेचे व्यवस्थापक भुषण मोरे यांनी नव्याने पीक कर्ज देण्यास नकार दिला. यामुळे योगेश पुरभे हे बँकेसमोर उपोषणास बसले आहेत.
आज उपोषणस्थळीराष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष दीपक वाघमारेंनी भेट दिली. यावेळी श्री. वाघमारे यांनी जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांना संपूर्ण हकीगत सांगत या विषयात लक्ष घालण्याची विनंती केली. त्यावर देवकर यांनी लवकरच संबंधित शेतकऱ्याची अडचण सोडविण्याचे आश्वासन दिले. एवढेच नव्हे तर, लीड बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत देखील श्री. वाघमारे यांनी संपर्क साधून शेतकरी मागील तीन दिवसापासून उपोषणास बसल्याची माहिती देत, लवकर उपोषण सोडविण्याची विनंती केली. यावेळी सीताराम मराठे, विनोद बयस, मनोहर परदेशी, जगदीश परदेशी, धर्मराज सिकरवार, मयूर परदेशी, शैलेन्द्रसिंह बयस आदी उपस्थित होते.