जळगाव : प्रतिनिधी) : शहरातील एका मुलीची इन्स्टाग्रामवर बदनामी केल्याप्रकरणी अनोळखी व्यक्ती विरोधात सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील एका कुटुंबातील मुलीचे फोटो कोठून तरी घेत, एका अनोळखी इन्स्टाग्रामवर धारकाने मुलीचे फोटो ठेवत त्यावर कमेंट करीत बदनामी केली. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नी.लीलाधर तायडे हे करीत आहेत.