जळगाव (प्रतिनिधी) महिलेच्या नावाने फेसबुकवर बनावट अकाऊंट त्याार करुन त्सोच वेगवेगळ्या क्रमांकावरुन महिलेच्या नातेवाईकांमध्ये बदनामीकारक मजकुर व्हायरल केला. ही घटना दि. १२ मार्च रोजी शहरातील एका परिसरात घडली. याप्रकरणी संशयित राहुल उर्फ गणेश दिनकर कळिकर (रा. देशमुखवाडी, शिवने पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील एका परिसरात विवाहिता आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. दि. १२ फेब्रुवारी रोजी पासून संशयित राहुल उर्फ गणेश दिनकर कळींकर हा वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरुन महिलेच्या नातेवाईकांना महिलेची बदनामी होईल असा मजकुर पाठवित होता. तसेच त्याने महिलेच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट देखील तयार केले आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर महिलेने तात्काळ रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार संशयिताविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोनि राजेंद्र कुटे हे करीत आहे.