जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात तापमानात झालेला बदल, अवकाळी पाऊस व डेंग्युच्या डांसासाठी असलेले पोषक वातावरण निर्माण झाल्याने जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील नायगावला डेंग्यूची साथ सुरू झाली आहे. दोनच दिवसात गावात ७संशयितांपैकी ४ रूग्णांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहे. तर जळगाव तालुक्यातील नशिराबाद व यावल तालुक्यातील पाडळसे येथे प्रत्येकी एक रूग्ण आढळल्याने जिल्ह्यात डेंग्यूने डोकेवर काढले आहे.
जिल्ह्यात सध्यास्थितीत मुक्ताईनगर तालुक्यातील नायगावला ४ तर नाशिराबाद १, पाडळसे १ रुग्णांचा डेंग्यू अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. पाच महिन्यात १० डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली आरोग्य केंद्रांतर्गत उपकेंद्र आहे. साथीचा उद्रेक त्याठिकाणी सर्वेक्षण मोहिम सुरू केली आहे.
पथकाकडून तपासणी सर्वेक्षण
नायगाव येथे पथकाकडून तपासणी व सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. याठिकाणी साथीचा उद्रेक आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागातर्फे टीम नियुक्त करण्यात आली आहे. वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यात डेंग्यूचा उद्रेक होण्याची शक्यता लक्षात घेता आरोग्य विभागाचे पथक याठिकाणी लक्ष केंद्रीत करीत आहेत.
रूग्णांच्या संख्येत वाढ
जिल्हाभरात अवकाळी पाऊस झाल्याने ग्रामिण भागात डबके पाऊस साचलेल्या ठिकाणी डासांची उत्पत्ती होत असुन ग्रामिण भागातील रूग्णालयांमध्ये ओपीडी वाढली आहे. तीन गावांमध्ये रू ग्ण आढळल्याने या भागात सर्वेक्षण सुरू झाले आहे. दरम्यान खासगी रूग्णालयात अनेक रूग्ण उपचार घेत असल्याने डेंग्यु रूग्णांचा आकडा वाढल्याची देखील शक्यता आहे.