जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपारीची कारवाई केलेल्या महेंद्र उर्फ लहाण्या अशोक महाजन (वय ३०, रा. तळेले कॉलनी, जुना खेडीरोड) या गुन्हेगाराला एमआयडीसी पोलिसांनी अजिंठा चौफुली येथे सापळा रचून मुसक्या आवळल्या. ही कारवाई सोमवार दि. ३० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील अजिंठा चौफुली परिसरामध्ये शनिपेठ पोलीस ठाण्याकडून हद्दपार केलेला संशयित आरोपी महेंद्र उर्फ लहाण्या अशोक महाजन हा फिरत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याला मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय बडगुजर, पोलीस नाईक प्रदीप चौधरी, रतन गीते, साईनाथ मुंडे यांच्या पथक रवाना झाले. या पथकाने सोमवारी ३० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता गुन्हेगार महेंद्र उर्फ लहाण्या महाजन याला संशयास्पदरित्या फिरतांना अटक केली. याप्रकरणी पोलीस नाईक प्रदीप चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय बडगुजर करीत आहे.
















