TheClearNews.Com
Friday, March 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

श्यामखेडा, भोणे, बिलखेडा व जांभोरे येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न !

vijay waghmare by vijay waghmare
January 17, 2026
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

पाळधी / धरणगाव ( प्रतिनिधी ) –  ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या पायाभूत सुविधा, मूलभूत गरजांना प्राधान्य आणि सर्वसामान्यांच्या जीवनात प्रत्यक्ष बदल घडवणारा विकास हाच आपल्या कामाचा केंद्रबिंदू असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी धरणगाव तालुक्यातील विविध गावांत कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण प्रसंगी केले.

ते पुढे म्हणाले की, “गावाचा सर्वांगीण विकास झाल्यावरच गावाची खरी ओळख निर्माण होते. ही ओळख भक्कम करण्यासाठी निधीची कधीही कमतरता भासू दिली नाही. ग्रामपंचायत कार्यालय, चांगले रस्ते, स्मशानभूमी, शैक्षणिक परिसर सुशोभीकरण, मंदिर परिसर विकास या सर्व सुविधा तळागाळात पोहोचवण्यावर आमचा नेहमीच भर आहे. ‘गाव तिथे स्मशानभूमी’ हा उपक्रम आता संपूर्ण जिल्ह्यात राबवला जात आहे. जनसुविधा योजनांतर्गत जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असून, सर्वसामान्य माणसाचे जीवन सुकर करणे हाच आमचा खरा उद्देश आहे,” असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ठामपणे सांगितले.

READ ALSO

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

धरणगाव तालुक्यातील श्यामखेडा, भोणे, बिलखेडा व जांभोरे या भागांत विविध विकासकामांचे भूमिपूजन व काही ठिकाणी लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडले. एकूण सुमारे ८ कोटी रुपयांच्या विकासकामांना सुरुवात झाली असून अनेक कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

या कामांचे झाले भूमिपूजन व लोकार्पण
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत विवरे – जांभोरे–सार्वे खुर्द ते बिलखेडा या १०.५० किमी रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण; यात २७ ठिकाणी पाईप व काँक्रीट मोऱ्या तसेच ४१० मीटरचे काँक्रीटीकरण होणार आहे (६ कोटी ५२ लक्ष), धरणगाव ते सार्वे या १ किमी शेतरस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण (४९ लक्ष), श्यामखेडा येथे अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण, शाळा परिसर सुशोभीकरण व पेव्हिंग ब्लॉक बसवणे (१० लक्ष), बिलखेडा येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम (२० लक्ष), भोणे येथे स्मशानभूमी पोहोच रस्ता, लक्ष्मीनारायण मंदिर परिसरात काँक्रीटीकरण व सभागृह बांधकाम (१ कोटी) या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
तर आमदार निधीतून जांभोरे येथे दोन प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण (२० लक्ष), बिलखेडा येथे महानुभव गल्लीतील रस्त्याचे काँक्रीटीकरण व सांत्वन शेड बांधकाम (२१ लक्ष), भोणे येथे स्मशानभूमी पोहोच रस्ता या कामांचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा नेते तथा जिल्हा परिषदेचे तत्कालीन सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले. सूत्रसंचालन तालुकाप्रमुख डी. ओ. पाटील यांनी केले, तर आभार माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे यांनी मानले. यावेळी प्रत्येक गावात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे महिलांनी औक्षण करून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढत आणि फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोषात स्वागत करण्यात आले.

यांची होती प्रमुख उपस्थिती
कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, माजी पं. स. सभापती अनिल पाटील, प्रेमराज पाटील, मुकुंदराव नन्नवरे, तालुकाप्रमुख डी. ओ. पाटील, सचिन पाटील, शिवसेना महानगरप्रमुख संतोष पाटील, शहरप्रमुख विलास महाजन, गटविकास अधिकारी के. व्ही. वानखेडे, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे उपअभियंता जितेंद्र सोनवणे, शाखा अभियंता विशाल पाटील, पोलीस निरीक्षक एस. एच. पवार, पप्पू भावे, मंगलअण्णा पाटील, नाटेश्वर पवार, शेतकी संघ अध्यक्ष गजानन पाटील, मार्केटचे माजी सभापती प्रेमराज पाटील, प्रमोद पाटील, समाधान पाटील, सरपंच संगीता पाटील, अनिता गुजर, चंद्रकांत भदाणे, तसेच संबंधित गावांचे सर्व उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विकास सोसायटीचे सदस्य तसेच शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख भैया मराठे, तालुकाप्रमुख दीपक भदाणे, नितीन पाटील, विभाग प्रमुख गणेश भिंगारे व शिवसेना युवा सेना पदाधिकारी यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Development is the focus that will change the face of rural areas - Guardian Minister Gulabrao PatilDhrngoan

Related Posts

Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Uncategorized

शेतकऱ्यांना दिलासा : कापसावर आयात शुल्क लागू होताच दर वाढले

January 4, 2026
Next Post

Weekly horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 17 ते 24 जानेवारी 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यातील काही शहरांमध्ये लॉकडाऊन केले जाऊ शकते, आरोग्यमंत्र्यांची माहिती

March 22, 2021

शाळेतून घरी जाणाऱ्या शिक्षिकेला टिप्परने चिरडले !

October 27, 2023

सासरवाडीहून घरी परतणाऱ्या मनपा कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू !

December 20, 2023

जयंत पाटील-देवेंद्र फडणवीस एकाच गाडीत ! राजकीय चर्चेला उधाण

September 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group