मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात शिवसेनेने भाजपसोबत सरकार स्थापन करावे आणि यात फडणवीस सीएम तर एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री करावे असा प्रस्ताव नाराज असलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी दिला असल्याचे नवीन वृत्त समोर आले आहे.
एकनाथ शिंदे यांनी दादा भुसे, संजय राठोड आणि संजय बांगर या तिन नेत्यांशी चर्चा करून आपला प्रस्ताव हा उध्दव ठाकरे यांना सांगावा असा निरोप दिला. यात शिवसेनेने भाजपसोबत राज्यात सरकार स्थापन करावे. तसेच देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री असतील असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. अर्थात, उध्दव ठाकरे यांनी राजीनामा देण्याचे त्यांनी थेट सूचित केले आहे. तर, दुसरीकडे आज शिवसेनेची तातडीची बैठक होत असून यात पक्षाचे अन्य मंत्री आणि आमदार व खासदार सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यात आता नेमके किती जण सहभागी होणार याची उत्सुकता लागली आहे