अमळनेर (प्रतिनिधी) चावरा आश्रम या देवगांव देवळी येथील मुलांच्या वस्तीगृहात उत्तर महाराष्ट्रातील गरीब होतकरू वंचित मुलं शिक्षण घेऊन अनेक उच्च पदावर त्यांनी नेत्र दीपक प्रगती केलेली आहे. देवगाव देवळी येथील चावरा आश्रमाने चालवलेला ज्ञानयज्ञ मानवता उभा करणार आहे. चावराआश्रम नसून एक परिवार आहे. नेहमीच विद्यार्थ्यांच्या परिवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहून सहकार्य करत असतात. असे चावराश्रम मुलांचे वस्तीगृह देवगाव देवळी ता. अमळनेर येथील नाताळ उत्सव सोहळा निमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्ष रेव्ह फा.सिजन थाँमस सी.एम.आय धुळे हे मार्गदर्शन करतांना बोलत होते.
व्यासपीठावर मा.सि. अर्चना सी.एस.सी (मॅनेजर सेंट मेरी स्कूल मंगरूळ) देवगांव देवळी येथील महिला सरपंच सरलाबाई पुंडलिक पाटील, चावराश्रम वस्तीगृहाचे संचालक फादर जोसेफ अकरा सी.एम.आय, देवगांव देवळी हायस्कूलचे शिक्षक तथा पत्रकार ईश्वर महाजन, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक त्र्यंबक रणदिवे होते. कार्यक्रमाची सुरुवात चावरा आश्रम मध्ये विद्यार्थ्यांनी विविध नाताळा निमित्ताने कलाकृती देखावा साकारलेला होता त्याचे फित कापून उद्घाटन करण्यात आले.
नंतर मान्यवरांचा शाल श्रीफळ बुके देऊन सन्मान करण्यात आला. देवगाव देवळी येथील उपशिक्षक ईश्वर महाजन यांनी चावराश्रम यांनी मनोगतात सांगितले की पंधरा वर्षापासून चावरा आश्रम सुरू केल्यामुळे अनेक तळागाळातील मुलांना शिक्षणाची सोय झाली. व देवगाव देवळी हायस्कूलमध्ये, व जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थी शिक्षण घेऊन चावराश्रम व देवगांव देवळी गावाचे व शाळेचे नाव उज्वल करीत असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. यासाठी चावरा आश्रमचे फादर, अधीक्षक राजू सोनकांबळे व सुपडू आबा व महिला व कर्मचारी यासाठी नेहमीच चावरा वस्तीगृहाच्या कामात कोणतेही प्रकारची तळजोळ करत नाही. सदैव सेवेसाठी तत्पर असतात.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार फादर जोसेफ अकरा सी.एम.आय संचालक यांनी मानले.नाताळ उत्सव सोहळा निमित्ताने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू सोनकांबळे यांनी केले तर कार्यक्रमाची अँकरिंग ईश्वर वसावे, धम्मदीप सपकाळे यांनी केले.चावरा आश्रम मध्ये शिक्षण घेऊन व महात्मा फुले हायस्कूलचे नाव उज्वल करणाऱ्या तुषार देशमुख,शरद खैरनार, आनंदा चौधरी, प्रफुल सोनवणे, प्रा.मंगेश महाले, मयूर पाटील यांचा मान्यवरांनी सत्कार केला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध नाताळोत्सव निमित्ताने डान्स सादर करत श्रोत्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला. यावेळी सेंट मेरी हायस्कूलच्या शिक्षिका व इतर चावरा आश्रम मधील फादर व ब्रदर, चावराआश्रम मधील सर्व विद्यार्थ्यांचे पालक बाहेरगावाहून आले होते. देवगांव देवळी येथील सर्व ग्रामस्थ मंडळ,विद्यार्थी उपस्थित होते नंतर स्नेह भोजनाच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजू सोनकांबळे सुपडू पाटील, सुरेखाताई पाटील, सुनंदाताई पाटील, विठोबा पाटील, योगेश पाटील ,विलास महाजन, सनी पाटील ,बापू महाजन, किरण मोरे, दीपक ढामरे चेतन पाटील,व देवगांव देवळी ग्रामस्थ यांनी सहकार्य केले.