जळगाव (प्रतिनिधी) शहरात अनधिकृत बिनशेती वापर शासकीय दंडात्मक रक्कम न भरल्याने गट नंबर ३४५/१ राधेश्याम सुरजमल व्यास यांचे मालकिचे गोडाऊन आज रोजी मा. तहसिलदार जळगाव यांचे जप्ती आदेशनुसार सिल करण्यात आले.
तसेच गट नंबर २८/५, गट नंबर ३७/५ /२ दौलतमल नथमल जैन यांचे मालकीच्या जागेवरील मिक्सिंग प्लांट मा. तहसिलदार जळगाव यांचे कडील जप्ती आदेश नुसार सिल करण्यात आले. ही कारवाई योगेश नन्नावरे मंडळ अधिकारी जळगाव शहर तसेच तलाठी जळगाव शहर रमेश वंजारी, कोतवाल तायडे सुकदेव यांचे पथकाने सदरील कारवाई केली.