साकळी प्रतिनिधी । फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एकाकाचे स्वयंसेवक गौरव महाजन, साक्षी पाटील, पूर्वा भंगाळे यांचा पालकांसोबत भारतीय युवा परिषदे मार्फत आयोजित कार्यक्रमात ‘करोना योद्धा’ म्हणून सन्मान करण्यात आला.
कोरोनाविषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवकांनी स्थानिक प्रशासन, पोलीस, डॉक्टर्स, सफाई कर्मचारी यांना मोलाचे सहकार्य केले. यासोबत लॉकडाऊन च्या काळात आपआपल्या घरी पायी प्रवास करणाऱ्या लोकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा पुरवण्यात हिरीरीने भाग घेतला. या सर्व कामाची दखल घेऊन भारतीय युवा परिषदे मार्फत डॉ अजित थोरबोले प्रांताधिकारी , शरद जिवराम महाजन, जितेन्द्र कुमार, तहसीलदार, यावल व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या स्वयंसेवकांना ‘कोरोना योद्धा’ म्हणून सन्मान करण्यात आला.
सन्मानित स्वयंसेवकांनी त्यांच्या गौरवाचे श्रेय राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ नितीन चौधरी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा शेरसिंग पाडवी, सहाय्यक महिला कार्यक्रम अधिकारी डॉ सरला तडवी यांना दिले. महाविद्यालयातील स्वयंसेवकांच्या उल्लेखनीय कामगिरी व सत्काराबद्दल तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष शिरीष चौधरी, आमदार रावेर विधानसभा मतदारसंघ, उपाध्यक्ष प्रा डॉ सुधाकर काशिनाथ चौधरी, उपाध्यक्ष दामोदर हरी पाटील, चेअरमन लीलाधर विश्वनाथ चौधरी, व्हाईस चेअरमन प्रा किशोर रामदास चौधरी, सचिव प्रा मुरलीधर तोताराम फिरके, सदस्य प्रा पी एच राणे, प्रा मिलिंदबापू वाघुळदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी, उपप्राचार्य प्रा अनिल सरोदे, उपप्राचार्य प्रा डॉ अनिल भंगाळे, उपप्राचार्य प्रा दिलीप तायडे, उपप्राचार्य डॉ उदय जगताप, इतर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक यांनी कौतुक केले आहे.