पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) धरणगावातील धनगर समाज बांधवांनी आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची पाळधी येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी पंच मंडळातील सदस्यांनी समाज मंगल कार्यालयासाठी निधीची मागणी केली. गुलाबभाऊंनी तात्काळ समाज बांधवांची मागणी मान्य केली.
पाळधी येथील निवासस्थानी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची धरणगावातील धनगर समाज बांधवांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी पंच मंडळातील सदस्यांनी समाजाच्या मंगल कार्यालयासाठी निधीची मागणी केली. यावेळी ना. पाटील यांनी सर्वोतोपरी मदत करण्यासह तात्काळ निधी देण्याचेही मान्य केले. यावेळी राजमाता अहिल्यादेवी होळकर धनगर समाज पंच मंडळ धरणगाव अध्यक्ष किशोरबापू धनगर, उपाध्यक्ष राजेंद्र बापू धनगर, गणेशआप्पा धनगर, माधवआप्पा धनगर, नानाभाऊ धनगर, गुलाबभाऊ धनगर, हिरालालभाऊ धनगर, हरिचंदआप्पा धनगर, हिलालबाबा धनगर, शरदभाऊ धनगर, अनिलभाऊ धनगर, सम्राटभाऊ धनगर, बापू धनगर, वाल्मीकभाऊ धनगर, पप्पूभाऊ धनगर, संभाजीभाऊ धनगर, कैलासभाऊ धनगर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.